पुणे ःशहरी व्यक्तींना दुर्लभ असणाऱ्या काजव्यांची मौज ‘ सिनर्जी हॉलिडे व्हिलेज ‘ आयोजित ‘ काजवा महोत्सव ‘ मध्ये लुटण्यात आली.
कुरुंजी ‘ भोर येथे पुणेकरांनी लुटला ‘ या काजवा महोत्सवा ‘ चा आनंद लुटला. शनिवार, रविवारची सुटी पकडून हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. रोटरी क्लब पुणे गांधी भवन यांच्या सदस्यांसहित ५०० पुणेकर सहभागी झाले.
पावसाळा सुरू होताना राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कुरुंजी परिसरात हजारो काजव्यांचा प्रकाश महोत्सव दिसायला लागतो. या वर्षी पाऊस उशीरा सुरु झाल्याने काजव्यांचा चमचमाट जूनच्या पंधरवड्यातही पाहायला मिळाला.
रात्री आबालवृद्धांनी एकत्रितपणे निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार अनुभवला. राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, गणेश जाधव यांनी स्वागत केले

