महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 200 रोपांचे वाटप
पुणे : ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी’ पर्यावरण विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवारी रोप वाटप करण्यात आले. यावेळी पराग आठवले (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग) यांच्या हस्ते गणेश पेठ येथील स्थानिक महिलांना रोपे देण्यात आली. एकूण 200 रोपांचे वाटप करण्यात आले.
पर्यावरण दिनी ‘झाडे लावा झाडे जगवा, प्रदुषण टाळा’ हा संदेश देण्याच्या उद्देशाने हा रोप वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माजी महापौर आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्ष कमल व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे रोप वाटप झाले. याप्रसंगी प्रतिभा शिंदे, भारती कोंडे, गीता तारु, सारिका गोरड, सुनिता गुजर, सुरेखा शिंदे आणि डॉ.पल्लवी शिंदे उपस्थित होते.