पुणे-महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स्, सायन्स अॅण्ड कॉमर्स’ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल 95.42 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेची हर्षदा महेश पाटील हीने 92.76 टक्के मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला.
वाणिज्य शाखेत मुस्कान सलीम खान हीने 86.76 % तर कला शाखेत सिमरन पीटर दास हीने 87.84 % मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, अशी माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य गफार एल. सय्यद यांनी दिली.
महाविद्यालयाचा विज्ञान शाखा निकाल 98.24 %, वाणिज्य शाखा निकाल 91.60 %, कला शाखा निकाल 98.68% तर एच एस सी व्होकेशनलचा निकाल 100 % लागला आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, महाविद्यालयाच्या प्राचार्या आएशा शेख यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.