पुणे : पुणे महापौर चषक राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाने विजेती पदाची कामगिरी केली आहे. या गटात आझम स्पोर्टस अकॅडमी च्या खेळाडूंचा समावेश होता.
पुणे महापालिका आणि पुणे शहर सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा स. प. महाविद्यलयाच्या मैदानावर झाली.
‘आझम स्पोर्टस अकॅडमी’ चे संचालक गुलझार शेख यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजेत्यांचे ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए.इनामदार, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शैला बुटवाला, गफार शेख यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पुणे जिल्हा संघाने कोल्हापूर संघाचा १२-०१ ने पराभव केला. यामध्ये किरण ला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. पुणे जिल्हा संघाकडून बी अलिशा हीने २, हाजिरा शेख ने ३, किरण ने ३, फैजनाने २, फरहाने १, तर अल्फाराने १ होमरन काढला

