पुणे ः‘भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’च्या कॉम्प्युटर इंजिनिअरींग, केमिकल, सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींग या विभागांना ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन’कडून मानांकन (अॅक्रिडिटेशन) मिळाले आहे. ‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’चे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी ही माहिती दिली. हे अॅक्रिडिटेशन तीन वर्षांसाठी आहे.
या सर्व विभागांना हे अॅक्रिडिटेशन सलग तिसर्या वेळेस प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. शिवाजीराव कदम, विश्वजीत कदम यांनी अभिनंदन केले.