‘जश्न – ए -सर सय्यद’ : अल्पसंख्याकांच्या शिक्षण महर्षीच्या, प्रागतिक विचारांचा पुण्यात महोत्सव
पुणे :‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट’ आणि ‘नॅशनल कौंसिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज’, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जश्न – ए- सर सय्यद’ या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता हाय-टेक हॉल, आझम कॅम्पस येथे होणार आहे, अशी माहिती डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट च्या अध्यक्ष आबेदा इनामदार यांनी पत्रकाद्वारे दिली.
अल्पसंख्याकांच्या शिक्षण महर्षीच्या विचारांचा, प्रागतिक विचारांचा पुण्यात महोत्सव या निमित्ताने होत आहे.
सर सय्यद यांना अल्पसंख्यक शैक्षणिक , सामाजिक, प्रागतिक चळवळीचे प्रणेते मानले जाते.
प्रसिद्ध लेखक आणि संशोधक शामिम तारिक (मुंबई) यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यशाळेमध्ये डॉ. गुलाम दस्तगीर (संचालक,‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट’), डॉ. कमार सिद्दीकी (मुंबई), डॉ.अल्ताफ अन्जुंमन (काश्मीर), डॉ. काझी नावेद (औरंगाबाद), डॉ. जनीसार मोईन (हैदराबाद), डॉ. समीना पठाण (पुणे) आदी सहभागी होणार आहेत.
कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.तारिक मन्सूर (कुलगुरू, अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी) असून, डॉ. पी.ए.इनामदार (नॅशनल कौंसिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज, नवी दिल्ली, मंडळाचे माजी सदस्य) उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम डॉ. ए. आर. शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे होणार आहे.