पुणे(प्राब न्यूज )-काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते प्राप्त झालेली आहेत अशा मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छूकांचा डोळा आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूकांकडून त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांना पुढे केले जात आहे. तर काही मात्तबर वंचितमुळे मतविभाजन होऊ नये यासाठी स्वताचा कार्यकर्ताच डमी उमेदवार म्हणून देण्याची रणनीती आखण्यात येत आहे. नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत ५२ विधानसभा मतदारसंघात प्रभावी मते घेतली आहेत. तर 66 विधानसभा मतदारसंघात किमान 20 हजारहून जास्त मते घेतली आहेत. अशा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसणार आहे. हे गृहीत धरूनच वंचितचा प्रभाव व मतविभाजन रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून डमी उमेदवार घुसविण्याचा डाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा वंचितच्या पदाधिकारी यांचा आरोप आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी 30 जुलैला जाहीर होणार आहे. वंचित आघाडी स्वबळाची तयारी करीत असून महाआघाडीत सामील होण्याची शक्यात धूसर आहे. पहिल्या यादीत विदर्भातील उमेदवारांचा समावेश असणार आहे. विदर्भातील उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूकीची पुर्वतयारी म्हणून इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. 13 ते 16 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर मराठवाड्यातील मतदारसंघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर मुलाखती वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटर्री बोर्ड सदस्य अॅड अण्णाराव पाटील, अशोकभाऊ सोनोने आणि रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतल्या जाणार आहे. मराठवाड्याकरीता मुलाखतींचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे – उस्मानाबाद – 21 जुलै 2019, बीड – 22 जुलै 2019, लातूर – 23 जुलै 2019, नांदेड – 24 जुलै 2019, हिंगोली – 25 जुलै 2019, परभणी – 26 जुलै 2019, औरंगाबाद – 27 जुलै 2019, जालना – दि.28 जुलै 2019 वरील तारखेला प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी सकाळी 10.00 वाजता पासून मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीत इच्छुकांना मतदारसंघातील सामाजिकदृष्ट्या जातीय समीकरण विचारले जाते तर राजकीयदृष्ट्या यश कसे मिळू शकते याचा अंदाज व शक्यतेबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत.
दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मधील निवडणुकीत 52 विधानसभा मतदारसंघात वंचितचा प्रभाव राहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला मतदानानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये वंचित आघाडीला असाच कल राहिला तर महाराष्ट्रातील १४ मतदारसंघात यश मिळू शकेल अशा स्वरूपाचे मतदान या निवडणुकीत झालेले आहे. तर महाराष्ट्रातील 52 मतदारसंघात दुसरा व तिसरा क्रमांकावरील मते प्राप्त करू शकेल यामध्ये 30 विधानसभा मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यास कारणीभूत ठरेल. तर 48 मतदारसंघात स्थानिक पातळीवरील निवडणुकीत महत्वपूर्ण राजकीय घडामोडीस पात्र ठरेल. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला 66 विधानसभा मतदारसंघात 20 हजार ते 1 लाख मते मिळालेली आहेत. आणि लोकसभा निवडणूक 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला 78 विधानसभा मतदारसंघात 10 हजार ते 20 हजार मते मिळालेली आहेत.
वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणूक 2019 मध्ये
20 हजार ते 1 लाख मते मिळालेले 66 विधानसभा मतदारसंघ |
||
मतदारसंघ क्र. | मतदारसंघ नाव | वंचित मते |
107 | 107 – औरंगाबाद मध्य | 99450 |
109 | 109 – औरंगाबाद पूर्व | 92347 |
286 | 286 – खानापूर | 78024 |
108 | 108 – औरंगाबाद पश्चिम | 71239 |
31 | 31 – अकोला पूर्व | 61712 |
29 | 29 – बाळापूर | 56981 |
111 | 111 – गंगापूर | 56023 |
287 | 287 – तासगाव-कवठेमहाकाळ | 54787 |
288 | 288 – जत | 53083 |
32 | 32 – मुर्तिजापूर | 52230 |
74 | 74 – चिमुर | 50989 |
33 | 33 – रिसोड | 44400 |
278 | 278 – हातकणंगले | 42325 |
285 | 285 – पळूस खडेगाव | 40169 |
28 | 28 – अकोट | 39177 |
86 | 86 – नांदेड उत्तर | 38795 |
26 | 26 – खामगाव | 38732 |
281 | 281 – मिरज | 38506 |
93 | 93 – कळमनुरी | 38442 |
27 | 27 – जळगाव(जामोद) | 36688 |
112 | 112 – विजापूर | 35462 |
105 | 105 – कणाद | 34263 |
72 | 72 – बल्लारपूर | 33759 |
94 | 94 – हिंगोली | 33473 |
92 | 92 – बसमत | 33348 |
97 | 97 – गंगाखेड | 32806 |
282 | 282 – सांगली | 32780 |
24 | 24 – सिंदखेडराजा | 30552 |
247 | 247 – मोहोळ | 30145 |
252 | 252 – पंढरपूर | 29323 |
84 | 84 – हदगाव | 28670 |
34 | 34 – वाशिम | 28351 |
251 | 251 – सोलापूर दक्षिण | 28092 |
280 | 280 – शिरोळ | 27913 |
250 | 250 – अक्कलकोट | 27625 |
89 | 89 – नायगाव | 27530 |
249 | 249 – सोलापूर शहर मध्य | 27468 |
73 | 73 – ब्रम्हपुरी | 27283 |
87 | 87 – नांदेड दक्षिण | 27222 |
248 | 248 – सोलापूर शहर उत्तर | 26870 |
98 | 98 – पाथरी | 26829 |
90 | 90 – देगलूर | 26339 |
95 | 95 – जिंतूर | 26079 |
85 | 85 – भोकर | 26020 |
173 | 173 – चेंबुर | 25146 |
22 | 22 – बुलढाणा | 24917 |
123 | 123 – नाशिक पूर्व | 24776 |
70 | 70 – राजुरा | 24480 |
126 | 126 – देओली | 24459 |
30 | 30 – अकोला पश्चिम | 23741 |
235 | 235 – लातूर शहर | 22654 |
20 | 20 – मुक्ताईनगर | 22636 |
82 | 82 – उमरखेड | 22223 |
242 | 242 – उस्मानाबाद | 22058 |
99 | 99 – परतूर | 21700 |
23 | 23 – चिखली | 21658 |
96 | 96 – परभणी | 21335 |
88 | 88 – लोह | 21184 |
100 | 100 – घनसावंगी | 21085 |
208 | 208 – वडगाव शेरी | 21084 |
71 | 71 – चंद्रपूर | 21048 |
232 | 232 – केज | 20908 |
125 | 125 – नाशिक पश्चिम | 20784 |
21 | 21 – मलकापूर | 20702 |
233 | 233 – परळी | 20683 |
241 | 241 – तुळजापूर | 20412 |