पुण्याची ऐतिहासिक कोतवाल चावडी आजच्या पिढीला आठवते ? काय होता या चावडीचा इतिहास ? हि चावडी पाडली तेव्हा ढसाढसा रडलेली कुटुंबे पाहिली आम्ही ..या साऱ्या कुटुंबाना दूरवर बाहेर घरे दिली गेली . हि कोतवाल चावडी होती बेलबाग चौकात .. आता गणेशोत्सव काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बसतो त्या ठिकाणी .. पण वाहतुकीच्या समस्येचे कारण देवून हि चावडी पाडली गेली. हि चावडी जेवढी जुनी तेवढाच लक्ष्मी रोड हि जुना … ऐतिहासिक …या रस्त्यावरील दुकानांमध्ये पोटमाळा बांधायला परवानगी नव्हती … पोटमाळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडले .कारण पोटमाळे बांधले कि दुकानांमध्ये जास्त ग्राहक उभे राहतील .आणि त्यांच्या गाड्या लक्ष्मी रस्त्यावर उभ्या राहतील ..वाहतुकीची समस्या निर्माण होईल .. असे कारण देण्यात आले होते .
आता कोतवाल चावडी नष्ट झाली ,तिथे झाला वाहनतळ , लक्ष्मी रोडवर तर बहुमजली इमारती झाल्या , त्याही तळमजल्यावर पार्किंग च्या तळमजल्या शिवाय … डेक्कन जिमखान्यावरील सर्वांचे आवडते सिनेमागृह ‘नटराज ‘ नाहीसे झाले .एवढेच काय आता ‘केसरीवाडा .. होय टिळकांचा केसरीवाडा, तोही नाही का कमर्शियल इमारतीतरुपांतरीत झाल्यासारखा वाटतो .
जतन करा ,जतन करा .. म्हणून घोष करणाऱ्या महाभागांनी कात्रज ते शनवार वाडा हि पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा योजना तोडून मोडून इमारती बांधून नोटा जमा केल्या . …असो , अशा असंख्य बाबी आहेत त्याच पुणे शहरात 5 मजली इमारती च्या वर बांधकामाला बंदी होती .आता शनवार..वाड्या भोवती हि अनेकांना 5/5 माजली इमारतींना परवानगी मिळू शकते आहे .
जंगली महाराज रस्त्यावरील झाडे तोडण्याचा प्रयत्न तेवढा हाणून पाडण्यात आला .पण त्या झाडांची दिवसेंदिवस कोंडीच होत गेली .एवढेच काय , एकीकडे नदीची कोंडी ,दुसरीकडे सर्रास डोंगरफोड करता, करता च सहकारनगरमधील टिळक सोसायटीला झालेला विरोध देखील तेव्हा अयशस्वी झाला . जंगलात उभे राहिलेले पतंगराव कदमांचे भारती विद्यापीठ तसेच कात्रज ची दोन्ही धरणे कॉंक्रीटच्या जंगलाने वेढली गेली .तात्पर्य हे कि , जुन्या सोन्यासारख्या पुण्याचे वाट्टोळे झाले , आणि डोळ्यादेखत करून टाकले गेले.
आता बालगंधर्व रंग मंदिराची बारी आहे .. म्हणजे तिथे बारी असतेच काही वर्षांपासून … पण आता या वास्तुचीच बारी आली आहे … असे म्हणावे लागेल .नदीच्या किनारी ,संभाजी बागे लगत ,विस्तीर्ण अशा जागेत वसलेल्या या सुंदरीकडे अखेर डोळे वाळू लागले आहेत .
आणि बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला आहे . १० कोटी रुपयांची तरतूद ; त्यासाठी अत्यंत नामांकित हुशार ,दूरदृष्टीचे आयएएस अधिकारी कुणाल कुमार यांनी करून ठेवली आहे आणि आता ते पुढील आपल्या प्रमोशन साठी दिल्ली कूच करायला निघाले आहेत .
पर्यावरणाच्या नावाखाली आधीच सायकल ट्रॅक च्या गोंडस शब्दाने त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांच्या सहमतीने ३५० कोटीचा हा प्रकल्प पुणेकरांच्या माथ्यावर मारला आहे . जुने पुणे सायकलीचे पुणे होते म्हणे .. आता जंगली महाराज रस्त्यावर .. आपल्याला हा सायकल ट्रॅक पाहता येईल .. लहान मुळे खेळत असतात इथे या सायकली .. खाजगी वाहने धक्काबुक्की करत हॉर्न वाजवीत पुढे, पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असतात .
एकीकडे पर्यावरणाचा दाखला देत ,सायकलींचे शहर बनवू पाहणाऱ्या कुणाल कुमारांना दुसरीकडे बालगंधर्व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थळ बनवायचे आहे कि आंतरराष्ट्रीय दर्जाची इमारत बनवायचं आहे ..हे अद्याप गुल दस्त्यातच आहे .जागा मोठी आहे , नांदे तलाव इथे बांधायची आवश्यक्यता नव्हती .. तो बांधला , असो ..आता मोकळ्या जागा हिरवळी ने , आणि झाडांनी बहरून टाकणे , चांगले सुंदर,सुव्यवस्थित स्वच्छ् कॅन्टीन तिथे देणे , रंगमंदिराच्या आतील भागात अत्यंत सुव्यवस्थित स्वच्छता गृहे ठेवणे, त्यांची सातत्याने निगा राखणे ,कलाकारांच्या खोल्या अत्याधुनिक करून त्यांची निगा राखणे ,खुर्च्या आरामदायी बसविणे, लाईट आणि ध्वनी व्यवस्थेत अमुलाग्र सुधारणा करणे,अशी कामे असताना त्याकडे मात्र महापालिकेने सातत्याने दुर्लक्ष केले आहे .

एवढेच नाही तर , बालगंधर्व रंग मंदिर ही वास्तू महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील मुकुटमणी समजला जातो , अशा रंग मंदिराच्या तारखांचा काळाबाजार करणारी टोळी इथे वर्षानुवर्षे कार्यरत आहे या टोळीला .. मागच्या व्यवस्थापकांनी डोक्यावर बसवून ठेवले होते .. त्यामुळे बालगंधर्ववर हक्क सांगणारी मंडळी येथे निर्माण झाली आहेत .ती समांतर व्यवस्था चालवू पाहते असा ही आरोप होत आला आहे या साऱ्या गोष्टींकडे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना , आयुक्तांना कधी ही लक्ष का द्यावेसे वाटले नाही . बालगंधर्व हा .. नव्या कलावंतांचे आश्रयस्थान बनता,बनता या टोळीने फसवणुकीचा अड्डा बनविला आहे काय ? याकडे देखील कधी लक्ष दिले नाही . गणेशउत्सवाची शताब्दी ..महोत्सवासाठी 1 कोटी खर्च म्हणे .. या 1 कोटीचा खर्च कोणी मागितलाय आजवर .. ? विरोधक यावर ओरडणार कि नाही ?
अशा पद्धतीचे ‘आळीमिळी गप गिळी ‘चे लॉबिंग .. पालिकेत आणि रंगमंदिराच्या बाबत होत आहे काय ?
असे प्रश्न उपस्थित करणारी परिस्थिती सध्या निर्माण होईल असे दिसते आहे . यातून एक स्पष्ट झाले आहे .बालगंधर्व रंगमंदिराची डागडुजी आणि दैनंदिन निगा राखणे गरजेचेच आहे . पण त्याच्या पुनर्विकासाला परवानगी म्हणजे शहराचे वैभव नष्ट करायला परवानगी देणे होईल .
काळानुसार आता बदलले पाहिजे , वास्तू अलिशान केली पाहिजे , एका चे चार थिएटर केले पाहिजे .. अशी कारणे डोळ्यात धूळ फेक करणारी आहेत . १० कोटी ची सध्याची तरतूद.. पुढे २५ कोटी पर्यंत जाईल .. हा देखील विषय आहेच . आणि गंधर्व पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दुसरे नेहरू कलादालन आहेच . सध्याच्या काळात सिनेमागृहे ओस पडत आहेत .आता बालगंधर्व ला किती नाटके चालतात ? किती लावण्यांचे प्रोगाम चालतात ?हा हि अभ्यासाचा भाग आहे . आणि राजकीय कार्यक्रम इथे फुल्ल होतात ,पण नाटकांना थिएटर मिळत नाही अशी ओरड करणाऱ्यांच्या नाट्यसंस्थांच्या डायऱ्या तपासून पाहिल्या पाहिजेत . कोणाच्या नावावरचे थिएटर, आयत्या वेळी प्रत्यक्षात कोणी वापरले, या साठी याचा अभ्यास केला तर नेमके काय उजेडात येईल, हे देखील पाहिले पाहजे.
हा सर्व विषय एवढ्या सविस्तर मांडण्याचा मुद्दा एवढाच कि पुनर्विकास म्हणजे टेंडर … आणि पुनर्विकास करा पण आमची हि मते विचारात घ्या .. म्हणजे आणखी अडजेस्टमेंट ..असा तर पराक्रम होणार नाही ?
साफ साफ सांगा ना ..
कसला पुनर्विकास करता आहे, तसेच राहू द्यात .. फक्त स्वच्छता ठेवा , निर्मळ,पर्यावरणपूरक वातावरण ठेवा ,चांगले कॅन्टीन,चांगली आसने , चांगली व्यवस्था करा … सर्वत्र हिरवळ पसरवा..आणि ज्यांना आपल्या धंद्याच्या दृष्टीने राजकीय आधार बाळगावा लागतो अशा ‘त्या’ तारखांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीला हद्दपार करा …
असे झाले तर येथेच होतील चांगली नाटके , आणि येतील चांगले रसिक …नाही तर बालगंधर्वचा पूर्वी जो दर्दी रसिक होता तो आता कितपत उरला आहे ?

पण ही हिम्मत दाखविली आहे ,ती केवळ दीपक मानकर यांनी , बालगंधर्व चा पुनर्विकास कसला करता ? हात लावू देणार नाही बालगंधर्व इमारती ला …अशी डरकाळी सर्व प्रथम त्यांनीच फोडली महापालिकेच्या सभागृहात .. हि डरकाळी फोडली ती ऐका राजकारण्याने…
काही कलावंत आणि त्यांचे संबधित काय म्हणतात .. मीडियात थेट चर्चाच झाली नसती .. काय करायचे ते आपण काही कलावंत आणि पालिकेतील काहीजण बसून ठरवले असते आणि नंतर मिडीयाला सांगितले असते .. अजूनही समिती करू बसून निर्णय घेवू …पुनर्विकासाचा आराखडा बनवू …
.. समिती नको , चर्चा नको … आणि पुनर्विकास ही नको .. आहे त्याची निगा राखा ..सुंदरता राखा ,पावित्र्य राखा ,एवढीच ठाम भूमिका असेल, तरच ठीकआहे .. नाही तर दुकानदारी होणार हे मात्र नक्की ….