मुंबई-आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्री म्हणून त्यांचे पूत्र म्हणून फक्त आदित्य ठाकरेच उरले आहेत. उदय सामंत हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांचे एकमेकांशी वयक्तिक घनिष्ठ संबंध आहेत तरीही त्यांनी शिवसेनेची स्थिती पाहून शिंदे गटाकडे धाव घेतली.विशेष म्हणजे अगदी कालपर्यंत सामंत घसा ताणून उद्धव ठाकरेंचे गुणगान गात होते. तसेच शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांना परत मातोश्रीकडे येण्यासाठी साद घालत होते. मात्र शेवटच्या काही क्षणात असे काय घडले, की ज्यामुळे मंत्री सामंत हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला जाऊन त्यांना भेटले.
कोण आहेत उदय सामंत
उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. तसेच सध्या ते शिवसेनेकडून उच्च तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2014साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2004, 2009, 2014आणि 2019या चारही निवडणुका रत्नागिरीतून त्यांनी जिंकलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण नेतृत्व म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाते.