निर्मला सितारामन यांना अपमानास्पद वागणूक
पुणे :परदेशात काळा पैसा असणाऱ्यांची नावे,बँकांची नावे,खाती क्रमांक सर्व माहिती असताना काळा पैसा भारतात आणला नाही या यादीत केवळ आपल्या जवळचे आश्रयदाते यांची नावे असल्याने मोदी सरकारने काळ्या पैशाप्रकरणी कारवाई केली नाही असा स्पष्ट आरोप करीत अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्यावर विश्वास नसेल तर त्यांच्याऐवजी इतर कोणाला त्यांच्या पदावर बसवा पण सीताराम यांचा अपमान करू नका असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले आहे.
पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे ,गोपाल तिवारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . या परिषदेत चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धाेरणांवर जाेरदार टीका केली. चव्हाण म्हणाले,अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या अनेक बैठकांना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी निर्मला सितारामन यांना बाेलवले नाही. अर्थ मंत्रालयाच्या बैठका पंतप्रधान घेत आहेत. अर्थमंत्र्याला बैठकांना न बाेलवणे हा त्यांचा अपमान आहे. त्यामुळे निर्मला सितारामन यांचे काम समाधानकारक नसेल तर त्यांना त्यांच्या पदावर इतर कोणाला बसवा , 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अर्थ संकल्प मांडला जाईल. देशाची आर्थिक स्थिती पाहता हा महत्वाचा आहे. या अर्थसंकल्पात महत्वाचे निर्णय घेतले गेले नाही तर सध्याच्या मंदीमध्ये बदल होईल असे वाटत नाही.
अर्थ मंत्रालयाच्या बैठका अर्थमंत्री नाहीतर पंतप्रधान घेत आहेत. या बैठकीला अर्थमंत्र्यांना निमंत्रण दिले जात नाही. पंतप्रधानांनी मोठ्या व्यावसायिकांना बोलवले त्या बैठकीला अर्थमंत्री नव्हत्या. अर्थ मंत्रालयाच्या 15 बैठक झाल्या त्यातल्या अनेक बैठकांना निर्मला सीतारामन यांना बोलावले नाही. अर्थ मंत्रालयाची सर्व सूत्रे पंतप्रधानांनी आपल्या हाती घेतली आहेत. संसदेत बजेट काेण सादर करेल हाही एक प्रश्न आहे. सीतारामन यांनी जरी बजेट सादर केले तरी ते बजेट माेदींचे बजेट असेल.