पुणे- शिवसेनेचे (ठाकरे ) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. असे पत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख असलेल्या शिवसेनेकडून काढण्यात आले आहे. चांदेरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदेंच्या गटात प्रवेश करणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयातून पत्र काढण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
