नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्रातील देशाला दिशा देणारे नेते म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या शरद पवारांची संजय राऊत प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे याबाबत मोठी उत्सुकता असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे.पवार आणि राऊत यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेताना मोठी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती , शरद पवार सोमवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. यावेळी प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना संजय राऊतांवरील कारवाईविषयी आणखी काही प्रश्न विचारले. पण त्यानंतर शरद पवार पुढे चालत राहिले आणि आपल्या गाडीत जाऊन बसले. त्यामुळे शरद पवार सध्या याबाबत कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. परंतु, शरद पवार पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे शब्द टाकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन नेते तुरुंगात असताना शरद पवार यांनी त्यावेळी पंतप्रधांसमोर केवळ राऊतांचा मुद्दा मांडला होता. तेव्हादेखील शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील विशेष सख्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.ंं