पुणे महानगर पालिका हिरवळ : संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाला साथ देण्यासाठी शेतकरी बचाव संयुक्त कुती समिती, पुणे तर्फे आयोजित” शेतकऱ्याचे उद्धारकर्ते ” सर छोटूराम यांना अभिवादन निमित्त पुण्यातील माजी महापौरां तर्फे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. ” शेतकऱ्यांचे आसूड ” कार महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. ” सर छोटूराम व न्या पी. बी. सावंत यांच्या प्रतिमेला माजी महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी न्या. पी.बी.सावंत यांना आदरांजली वाहण्यात आली. या सभेस माजी महापौर व खासदार वंदना चव्हाण, महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, राजलक्ष्मी भोसले, कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, वैशाली बनकर , अभय छाजेड,श्याम देशपांडे,प्रशांत बधे, नितीन पवार, लोकायत संघटना जनता दल सेक्युलर चे विठ्ठल जाधव, आम आदमी पार्टी चे अभिजित मोरे व लोकायत चे कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत अनेक संघटनांनी सहभाग घेतला. सर्वांनी आपआपले मत व्यक्त करून शेतकऱ्याच्या या आंदोलनाला पाठिम्बा व्यक्त केला व केंद्र सरकार ने जे कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याला सर्व माजी महापौरांनी निषेध दर्शविला. आपले मनोगत व्यक्त करताना वंदना चव्हाण म्हणाले, कोणीही या देशात काही बोलू शकत नाही अशी परिस्थिती या केंद्र सरकार ने केली आहे. इंदिरा गांधी यांनी कशी इमर्जन्सी घोषित केली होती या विषयी बोलतात, पण ती इमर्जन्सी तेवढी वाईट नव्हती, त्या पेक्षा ही भयानक इमर्जन्सी आहे. सर्व भारतीयांना आता जागं करावं लागणार आहे, आपण सर्वांनी हे काम केलें पाहिजे. ही केंद्र सरकार सर्व काही खाजगीकरण करायला निघाली आहे. आपण सर्वानी आता कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेतली पाहिजे व सर्वांना समजून सांगितले पाहिजे. या प्रसंगी लोकायत कार्यकर्त्यांनी अनेक गीत सादर केले.