पुणे- महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून विरोधक आणि काही अधिकारी यांनी सत्ताधारी भाजपला कामच करू द्यायचे नाही असा चंग जणू बांधला असल्याचा आरोप आज भाजपच्या गोटातून करण्यात आला . तर अलीकडेच आलेले 2 मुंडे नामक अधिकारी हे त्यातल्या त्यात ताप देत असल्याच्या भाजपवासीयांच्या तक्रारी आहेत . पण सत्ताधारी असल्याने; आणि शहरात पालकमंत्री आणि राज्यसभा खासदार असे दोन गट पडल्याने .. सत्ताधारी भाजपची मोठ्ठी गोची होत आहे . याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत झालेल्या पुण्याच्या पाणी विषयावरील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीवर पालकमंत्र्यांसह आठ हि आमदारांनी अघोषित बहिष्कार टाकला . तर दोन्हीपैकी एक ही खासदारदेखील या बैठकीला उपस्थित नव्हते .
पीएमपीएमएल ला तुकाराम मुंडे आले आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कारभार सुरु केला आहे . पण यात सत्ताधारी भाजपची गोची करण्यात येत असल्याचे म्हणणे मांडले जात आहे . या पार्श्वभूमीवर मुंडे यांना परत बोलवा अशी भूमिका मध्यंतरी सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर त्यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले होते . पण आता अवघ्या 4 महिन्यापूर्वी जलसंपदा चे कपोले यांची बदली झाली . त्यानंतर महापालीकेबाबतची धोरणे मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी वेगळ्या स्वरूपात मांडायला सुरुवात केली . कार्यकारी अभियंता मुंडे नामक अधिकारी आहेत .त्यांनी पाणी कपात आणि रिव्हाईस बिल करून महापालिकेकडे जादा पाणी वापराबाबत ३५४ कोटी ची मागणी केली .एकीकडे २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी विरोधकांशीही मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांना हा आणखी मोठ्ठा झटका बसला .
या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जलसंपदा या दोघांच्या प्रशासनात पाण्याच्या प्रश्नावर ताळमेळ घालण्यासाठी आज मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कालवा समितीची बैठक बोलाविली होती.
या बैठकीला पालकमंत्री का उपस्थित नव्हते हे त्यांनाच विचारा असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले . मात्र ,आपणास निमंत्रण नव्हते असे सांगत हि बैठक केवळ प्रशासकीय पातळीवरच होती असाही खुलासा केला .
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांनी महापालिकेने पाण्यात साडेसहा टीएमसी पाणीकपात करावी असे आदेश दिलेले आहेत . या निर्णयाचा सर्वपक्षीयांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर बैठक मुंबई मध्ये होती. या बैठकीत फेब्रुवारी 2018 पर्यंत पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय झाला आहे.मात्र मार्च पासून काय ? हा प्रश्न आहेच .एकीकडे पीएमपीएमएल चे तुकाराम मुंडे हे सध्या पीएमपीएल चे दप्तर तर जलसंपदा चे टी एन मुंडे हे महापालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या दप्तर धुंडाळत असल्याचे चित्र आहे .याच पार्श्वभूमीवर त्यांनी रिव्हाईस बिल काढल्याचे सांगण्यात येते .पीएमपीएमएल च्या बसेस ,ठेकेदार आणि कामगारांनंतर तुकाराम मुंडे आता पीएमपीएल च्या प्राॅपर्टीज आता धुंडाळत आहेत . डेक्कन जिमखान्यावरील पीएमपीएमएल च्या बिल्डींग मधील नियमित भाडे देणाऱ्या एसबीआय ला देखील त्यांनी जागा खाली करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते . त्यांची हि मोहीम सुरु असताना पाण्याबाबत टी एन मुंडे यांनी ओरड सुरु केली आहे .या कात्रीत भाजपचे सत्ताधारी हैराण झाले आहेत . एकीकडे विरोधक आणि दुसरीकडे प्रशासन या दोहोंचा सामना करताना मोठी कसरत होते आहे .
शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला साडेअकरा टीएमसी पाणी मंजूर आहे. परंतु महापालिका 2012 पासून त्यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करीत आहे. जलसंपदा विभागाकडे काही शेतक-यांनी पुण्यात जास्त पाणी वापरले जात असल्यामुळे शेतीला पाणी कमी मिळते, अशी तक्रार केली होती. तक्रारीच्या सुनावणीनंतर जलसंपदा विभागाचे टी. एन. मुंडे यांनी महापालिकेने पाण्यात साडेसहा टीएमसी पाणीकपात करावी असे आदेश दिले. शिवाय साडेअकरा टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापरले म्हणून जलसंपदा विभागाने 2012-13 ते 2016-17 या कालावधीचे 354 कोटी रुपयांचे बिल पाठविले. जलसंपदा विभागाच्या या आदेशाचा सर्वपक्षीयांनी विरोध केला होता.
या पार्श्वभूमीवर आज मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कालवा समितीची बैठक झाली .
दरम्यान पुणे शहराला सध्या होणारा पाणीपुरवठा कायम राहणार असून सध्या महापालिका जलसंपदा विभागाकडून 15 टी एम सी पाणी घेते. आणि वाढती लोकसंख्या आणि 11 गावांचा समावेश याचा विचार करता 18 टी एम सी पाणी मिळावे असे लेखी मागणी करणारे पत्र आम्ही सर्वांनी दिलेले आहे .आणि तशी आमची आग्रही मागणी मागणी आहे. वाढीव 3 टी एम सी च्या मागणीचा फेब्रुवारीमध्ये विचार होणार असल्याचे जलसंपदा मंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीत निर्णय झाला आहे अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.