उपमुख्यमंत्रीपदाला अव्हेरण्याचा खवचट प्रकार-मानकरांच्या इशाऱ्यानंतर खेचले अध्यक्षांचे कान

Date:

पुणे-महापालिकेच्या नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेत आपल्या नेत्यांची हुजरेगिरी करताना केवळ वरोधक पदावर आहेत म्हणून अशा पदांची अवहेलना करण्याचा प्रकार महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांकडून झाल्याचे आज मुख्य सभेत उघड झाले. २०२०-२०१२ चा अर्थसंकल्प आज मुख्य सभेला स्थायी समितीने सादर केला . यावेळी अंदाजपत्रकाची पुस्तिका सर्व सदस्यांना दिली गेल्यावर यात मुख्यमंत्री ठाकरे यांचा आणि विपक्ष्नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो प्रथम पानावर असल्याचे दिसून आले त्यानंतर १ पान सोडल्यावर दुसऱ्या पानावर  उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो असल्याचे निदर्शनास आले .मध्यंतरी आमदार चंद्रकांत दादा पाटील आणि अन्य मान्यवरांचे फोटो आहेत . मुख्यमंत्र्यांनंतर वास्तविक पाहता तिथेच उपमुख्यमंत्री यांचा व नंतर विपक्ष्नेते फडणवीस यांचा फोटो  पदांच्या क्रमवारीनुसार आणि सन्मानधिकारा नुसार असायला हवा होता असा आक्षेप बजेट मांडून झाल्यावर महापालिकेतील राष्ट्रवादीचे नेते दिपाली धुमाळ तसेच माजी उपमहापौर दीपक मानकर , माजी महापौर प्रशांत जगताप ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी उपस्थित केला आणि याप्रकरणी जाब विचारला .कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी देखील कॉंग्रेसच्या २ आमदारांचे फोटो यात नसल्याचे निदर्शनास आणून दिले .आणि अशा पद्धतीच्या बालबुद्धीच्या राजकारणाचा निषेध केला . त्यांच्या आक्षेपाला उत्तरे देणे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी टाळल्याने त्यांचा सामना माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी करण्याचा प्रयत्न केला . अखेरीस महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी च्या अध्यक्षांना छपाई बदलून घेण्याचे आदेश देत यावर पडदा टाकला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ

पुणे - रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे...

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...