पुणे – शहरात फुटकळ कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात असताना कर्करुग्णांसाठीचे हॉस्पिटल मात्र सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) किंवा बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर सुरू करण्याचा घाट विशिष्ट व्यक्ती डोळ्यासमोर ठेऊनच कर्करुग्णांसाठीच्या स्वतंत्र हॉस्पिटल च्या विषयाला महिला बालकल्याण समिती ने मंजुरी दिल्याचा आरोप वैद्यकीय क्षेत्रातून होतो आहे. अशा योजना कोणाच्या घशात घालायचे, याचेही नियोजन करूनच योजना पुढे आणल्या जात असल्याचे चित्र आहे.
अगदी या साठीच सहा महिने रेंगाळलेल्या कर्करुग्णांकरिता स्वतंत्र हॉस्पिटलच्या प्रस्तावावरील धूळ बुधवारी झटकण्यात आली असून, या योजनेला महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने मंजुरी दिली. शुक्रवार पेठेतील महापालिकेच्या मिळकतीमध्ये हे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. कर्करुग्णांना सर्व प्रकारचे उपचार अल्पदरात देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. असे प्रथमतः तरी म्हटले आहे.
कर्करुग्णांना उपचाराकरिता शहरी गरीब योजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र, उपचार आणि त्यावरील खर्च लक्षात घेता, स्वतंत्र हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रस्ताव नगरसेवक अजय खेडेकर आणि सम्राट थोरात यांनी मांडला होता. त्यावर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. काही त्रुटी असल्याचे कारण सांगत, प्रस्ताव अभिप्रायासाठी पाठविण्यात आला. त्यानंतर संबंधित प्रस्ताव फारसा गांभीर्याने घेण्यातच आला नाही. तरीही, ही योजना सुरू करणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही होत नसल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर होता. अखेर अभिप्रायावर चर्चा करून तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला.