पुणे-खराडी भागामध्ये सर्व्हे नं. 4/1 मधील अनेक महिन्यापासून तयार असलेल्या जलतरण तलाव नागरिकांसाठी सुरू करण्यात यावा यासाठी आमदार जगदीश मुळीक यांनी मनपा आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली.
नागरिकांना मूलभूत सुविधा प्रमाणे इतर सुविधा देखील देण्यात याव्यात. तसेच परिसरातील अनेक नागरिकांना, तसेच तरुणांना खाजगी जलतरण तलावांमध्ये जावे लागत आहे. यामुळे त्यांना जास्त पैसे दयावे लागतात. तसेच भविष्यात खेळाडूंना देखील या जलतरण तलावाचा फायदा होणार आहे अशी माहिती आयुक्तांना देण्यात आली. यावर आयुक्त कुणाल कुमार यांनी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून एक महिन्यात हा जलतरण तलाव सर्वांसाठी खुला करणार असल्याचे सांगितले.