पुणे-कॉंग्रेसचे अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांची शाब्दिक वादळे धुड्कारून ,शिवसेनेचे संजय भोसले यांनी मोठ्या हिकमतीने पळविलेला मानदंड बळाच्या जोरावर परत मिळवून पुण्यावर ३२० कोटीची सायकल योजना लादण्यात भाजपला यश मिळाले .
सायकल योजना व सार्वजनिक स्वच्छता उपविधीवरून पुणे महापालिकेच्या आज झालेल्या सभेत अखेर या दोन्ही योजना गोंधळामध्ये मंजूर करून घेण्यात आल्या. या साऱ्या भानगडी बेकायदेशीर पद्धतीने केल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला मात्र या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विश्वास आणखी वाढला असून सत्तेच्या जोरावर यापुढील काळात विरोधकांना याच भाषेत उत्तर देण्याचा निर्धार करण्यात आला.
पहा ३२० कोटीच्या सायकल योजनेसाठी महापालिका सभागृहात काय आणि कसे घडले .. सायकल योजना मुख्य सभा भाग 2 (समाप्त )
विरोधकांवर मात करून सायकल योजना लादण्यात भाजपा ला यश (व्हिडीओ)
Date:

