Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पीएम मोदी अचानक लेह ला- चीन ला इशारा

Date:

लेह : वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) वरील तणावपूर्ण वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहला पोहचले आहेत. त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे देखील उपस्थितीतहोते. लडाखमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठी मोदींनी अचानकपणे केलेल्या या दौऱ्यातून चीनला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. 15 जून रोजी गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर भारत-चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. गलवान खोऱ्यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सीडीएस रावत यांच्यासोबत लेह दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. पण अचानकपणे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.मोदींनी आज संरक्षण प्रमुखांसमवेत लेहला भेट दिल्यामुळे चीनला भारताकडून थेट इशारा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या भागात तैनात असलेल्या लष्कर, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नीमू येथील पोस्टवर जाऊन लष्करी आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत याठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वी याठिकाणी केवळ CDS बिपिन रावत येणार होते. मात्र मोदींनी अचानक याठिकाणी भेट देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मागील दोन महिन्यांपासून भारत-चीन यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. वादग्रस्त मुद्यावर चर्चेतून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी चिनी सैन्यासोबत तसेच राजनैतिक स्तरावर चर्चा सुरु आहे. नीमू पोस्ट समुद्रसपाटीपासून 11 हजार फूट उंचीवर आहे. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली पोस्ट म्हणून नीमू पोस्ट ओळखली जाते. याठिकाणी अचानक भेट देत मोदींनी 14 कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी दक्षिण लष्करी कमांडचे लेफ्टनंट जनरल वायके जोशी, लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह देखील उपस्थितीत होते.

मोदींनी लडाखमध्ये जवानांना संबोधित केले. जवानांच्या शोर्याचा आणि बलिदानाचा देशाला अभिमान आहे. जवानांनी सर्व जगाला आपले शोर्य दाखवून दिले आहे. विस्तारवादाला थारा नाही, असे म्हणत त्यांनी चीनची आरेरावी सहन करणार नसल्याचा इशाराच चीनला दिला आहे.

लडाख हे भारताचे मस्तक आहे. त्यामुळे चीनने आपला विस्तारवाद विसरावं. विस्तारवादाचं युग आता संपलं आहे, आता विकासाचं युग आहे. विस्तारवादामुळे नेहमीच मानवजातीचा विनाश झाला आहे, असं म्हणत मोदींनी चीनला कठोर शब्दात सुनावलं आहे.

भारतीय जवानांचे बाहू पर्वतासारखे मजबूत आहेत. जवानांचे शौर्य आणि साहस, माँ भारतीच्या सुरक्षेसाठीचे त्यांचे समर्पन अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही इतक्या उंचीवर देशाच्या सुरक्षेसाठी ढाल बनून उभे आहात, त्याची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. तुमचा निश्चय या पर्यतांच्या कठोरतेपेक्षाही अधिक आहे. देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे. त्यामुळे मीआणि सर्व भारवासी निश्चिंत आहोत. तुम्ही जे शौर्य दाखवले आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला आपली ताकद काय आहे याची प्रचिती आली आहे असं म्हणत मोदींनी जवानांचे धैर्य वाढवले आहे.

व्लादिमिर पुतीन यांच्यासाठी राज्यघटनेतच बदल; 2036 पर्यंत सत्तेवर?
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या काही ओळी जवानांना ऐकवल्या-

जिनके सिंहनाद से सहमी
धरती रही अभी तक डोल,
कलम, आज उनकी जय बोल.
मैं आज अपनी वाणी से आपकी जय बोलता हूं…

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या शहीदांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांचा पराक्रम आणि सिंहनादाने भूमाता अजूनही जयकारा करत आहे. आज सर्व देशवासियांचे मस्तक तुमच्या समोर आदरपूर्वक नमन होत आहे. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमची विरता आणि पराक्रमाने फुगली आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव आता महाराष्ट्र महोत्सव:पुण्यात गणेश मंडळांकडून जल्लोष

पुणे: कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनुसार आज...

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १० : पुणे-नाशिक...

‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच:शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि.१० : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे...

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.१०- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण,...