मुंबई – संभाजीनगरच नामांतर असो किंवा कुठलाही विषय ठाकरे सरकारची सध्याची भूमिका फक्त सत्ता टिकवणे हिच आहे. केवळ सत्तेच्या लाचारीपोटी आपल्या सर्व भूमिका बासनात गुंडाळणं अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे, अशी टिका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, शिवेसनेची आता ती धमक राहिली नाही. कॉंग्रसेने जाहिर केले की आमचा नामांतराला विरोध असेल व त्यानंतर महाविकास आघाडी सरकरामधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने तलवार म्यान केली आहे. कारण आता मला बाळासाहेबाची शिवसेना दिसत नाही. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेची जी धमक होती ती आताच्या शिवसेनेत नाही, सत्तेसाठी शिवसेना वेळोवेळी लाचारी पत्करत आहे. त्यामुळे नामांतराच्या विषयावरुन जर कॉंग्रेसचा दबाव आला तर शिवसेना ही कॉग्रेससमोर नांगी टाकेल असा टोलाही दरेकर यांनी लगाविला.
शिवसेना नेते संजय राऊत यांची वक्तव्ये अर्धवट माहितीच्या आधारे केलेली असतात, गेल्या पाच वर्षांमध्ये संभाजीनगर महापालिकाकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही, नामांतरावरून पालिकेकडून प्रस्ताव आल्यास राज्य सरकारने त्याला मंजुरी देणे व नंतर केंद्राकडे आवश्यक असल्यास पाठवला जातो. कुठलीही राजकीय प्रक्रिया समजुन न घेता. कोणतीही गोष्ट त्याचा अंगाशी आली. की भाजपवर ढकलून दिली जाते.अश्या प्रकारची त्यांची भूमिका आहे अशी टिका प्रविण देरकर यांनी केली.
दरेकर यांनी यावेळी सांगितले की, जर आता त्यांना खरंच संभाजीनगर नामांतर करायचं असेल तर महापालिका तुमची आहे तिकडे ठराव द्या राज्याला केबिनेट मध्ये ठराव पास करा. केंद्राची काही आवश्यकता लागली तर आम्ही निश्चितपणे करू. आता बाळासाहेब थोरात यांनी नामांतरावरून विरोध केला आहे. म्हणून अडचण होईल यासाठी पळवाट काढली जात आहे असा टोलाही दरेकर यांनी मारला.
संभाजीनगरच्या नामांतरावरून शिवसेनेची भूमिका सत्तेसाठी लाचारी पत्करणारी- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

