ऑरा’तर्फे आपल्या खास दिवाळी कलेक्शनवर अद्वितीय ऑफर

Date:

2a 3a

 

पुणे : प्रकाशाचा सण असलेली दिवाळी आली, की वातावरण आनंदोत्साहाने भरुन जाते. अलंकारांची खरेदी हा सण साजरे करण्याचा खास भाग असतो, हे लक्षात घेऊन ‘ऑरा’ने आपल्या सोने, हिरे व प्लॅटिनम अलंकारांच्या संग्रहावर अद्वितीय व थक्क करणाऱ्या ऑफर्स देऊ केल्या आहेत. यात ‘सुपर बंपर डिस्काऊंट’अंतर्गत प्रथमच सोन्याच्या त्या दिवसाच्या किंमतीवर ५ ते ७ टक्के, तर हिऱ्याच्या अलंकारांच्या एकूण मूल्यात २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्याखेरीज ‘ऑरा’च्या खास ‘क्राऊन स्टार’ हिऱ्यांवरही प्रथमच सवलत मिळणार आहे. ही उत्सुकता येथेच संपत नाही, कारण ‘ऑरा’ने काही नव्या आणि अभिजात अलंकार रचनाही सादर केल्या आहेत. त्यामध्ये ‘ऑरा प्लॅटिनम कपल ब्रेसलेट्स’, लोकप्रिय ‘गोल्ड घुंगरु बँगल्स’, पिंक गोल्डमध्ये जडवलेले डायमंड कलेक्शन आदींचा समावेश आहे. सणासुदीच्या हंगामातील भेटवस्तूंच्या सर्वाधिक लोकप्रिय पर्यायांपैकी ठरण्यावर ‘ऑरा’ ब्रँडने लक्ष केंद्रित केले आहे.

भारतात एक दशकापूर्वी प्लॅटिनम कपल बँड्सच्या रचनेत अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर ‘ऑरा’ने आता देशात यापूर्वी कधीही नजरेस न पडलेली प्लॅटिनम कपल ब्रेसलेट्स ही संकल्पना सादर केली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद, तसेच प्लॅटिनम ब्रेसलेट्स व चेन्स असा पुरुषांच्या अलंकारांचा वाढता कल लक्षात घेऊन ‘ऑरा’ने प्रेमाच्या अभिव्यक्तीचा प्रकार म्हणून मॅचिंग ब्रेसलेट्स सादर केले आहेत. प्लॅटिनम या धातूचा प्रेमभावनेशी निकटचा संबंध असल्याने हा रचनेमधील नैसर्गिक विकास ठरला आहे. दांपत्यासाठी बनवलेल्या या रचनांमध्ये पुरुषांच्या ब्रेसलेट्सची धाटणी मजबूत, तर स्त्रियांच्या ब्रेसलेट्सचे रुपडे अधिक नाजूक ठेवण्यात आले आहे.

या सणासुदीच्या हंगामात ‘ऑरा’ आपल्या सर्वोत्तम विक्री होणाऱ्या घुंगरु बँगल्सचीही प्रसिद्धी करणार आहे. या बांगड्यांच्या नाजूक किणकिणीने आणि सुंदर रचनेमुळे अनेक ग्राहक त्यावर लुब्ध झाले आहेत. या बांगड्यांच्या रचनेत धातूच्या छोट्या चेंडूंनी युक्त घुंगरांची पारंपरिक संकल्पना वापरण्यात आली आहे. परिणामी या घुंगरांची दिमाखदार समकालीन आवृत्ती तयार झाली असून या बांगड्या वापरताना त्या मनगटावर सुरेख किणकिणतात. त्या २२ कॅरट बीआयएस हॉल्मार्क्ड सोन्यापासून बनवल्या असून देशभरातील ग्राहकांत लोकप्रिय ठरत आहेत.

पिंक (गुलाबी) हा या ऋतूचा खास रंग असल्याने ‘ऑरा’नेही पिंक गोल्ड व प्लॅटिनम अशा दुहेरी रचनेतील हिऱ्यांचा सेट सादर केला आहे. प्लॅटिनमची सफेद चमक आणि त्याला पिंक गोल्डची साथ असा सुरेख संगम व एकात्मिक समतोल त्यात साधला गेला आहे.

या विशेष ऑफर्सबाबत प्रतिक्रिया देताना ‘ऑरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक विजय जैन म्हणाले, की दिवाळीचा सण नेहमीच खास असतो, परंतु या खेपेस ‘ऑरा’ने ग्राहकांसाठी मोहात पाडणाऱ्या ऑफर्स सादर करुन तो आणखी हर्षोत्फुल्ल बनवला आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करुन घेण्यासाठी आम्ही यंदा एक अद्वितीय ऑफर देऊ केली असून त्याअंतर्गत सोन्याच्या दरात प्रत्येक दहा ग्रॅमसाठी थेट २५०० रुपये सवलत दिली जाईल. याचाच अर्थ सोन्याच्या त्या दिवशीच्या भावात ५ ते ७ टक्क्यांची सवलत मिळेल, तसेच हिऱ्यांच्या अलंकारांच्या किंमतीवरही आम्ही २० टक्क्यांपर्यंत सवलत देणार आहोत. ग्राहकांना ‘ऑरा’ची उत्पादने खास नव्या रचनांत मिळण्याची संधीही देण्यात आली आहे. अलंकारांच्या खरेदीचा मुद्दा येतो तेव्हा ग्राहकांचा अनुभव अधिक फलदायी करण्यात ‘ऑरा’ ब्रँड नेहमीच आघाडीवर राहिला आहे. या ऑफर्सच्या माध्यमातून ग्राहकांना यंदाची धनत्रयोदशी आणि दिवाळी हा अधिक परिपूर्णतेचा अनुभव ठरावा, अशी आमची अपेक्षा आहे.

‘ऑरा’च्या या खास दिवाळी ऑफर्स येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत सुरु राहतील. अधिक तपशीलासाठी www.orra.co.in या संकेतस्थळाला अथवा देशभरातील २४ शहरांतील ‘ऑरा’च्या ३२ स्टोअर्सना भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑराविषयी

‘ऑरा’ ही भारताच्या सर्वोत्तम ज्वेलरी रीटेल साखळींपैकी असून त्याची देशभरात २४ शहरांत ३२ स्टोअर्स आहेत. रचनेतील नेतृत्व व उत्पादनातील अभिनवता यात हा ब्रँड आघाडीवर आहे. ‘ऑरा’ची टोक्यो, हाँगकाँग, अँटवर्प, मुंबई व न्यू यॉर्क येथे पाच ग्लोबल डिझाईन सेंटर्स आहेत.

 ‘ऑरा’ची डिझाईन्स कुशल कारागिरांकडून हस्तकौशल्याने परिपूर्ण बनवली जातात. या कारागिरीला अलंकार घडवण्याची शतकांची परंपरा आहे. ‘ऑरा’च्या संग्रहातील अलंकारांत उत्कृष्ट पैलू पाडलेले हिरे जडवलेले असतात. बेल्जियन हिरे ही ‘ऑरा’ची खासियत असून ते 22 कॅरट सोन्यात जडवलेले असतात. ‘ऑरा’च्या १७ स्टोअर्समध्ये हे हिरेजडित सुवर्णालंकार उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘ऑरा’ आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम डिझाईन्स व परिपूर्ण खरेदीचा अनुभव अशी संपूर्ण सेवा देणारे ज्वेलर्स ठरले आहेत.

‘ऑरा’च्या दालनांत हिरे व रत्ने विविध पैलू व आकारांत उपलब्ध आहेत. अभिनवता हे या ब्रँडच्या यशाचे गमक आहे. ‘ऑरा क्राऊन स्टार’ हा ७३ पैलूंचा हिरा, हे त्याचेच उदाहरण आहे. नेहमीच्या हिऱ्यांना ५७ पैलू असतात. ‘ऑरा’ने आपल्या हिऱ्यांचे पैलू व अचूक प्रमाण यांचा समन्वय साधल्याने त्यांचे हिरे कमालीचे तेजस्वी असतात. ‘ऑरा’ आपल्या हिऱ्यांना अत्यंत अचूकतेने पैलू पाडतो त्यामुळेच या हिऱ्यांना अजोड तेजस्विता प्राप्त होते.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...