पुणे- पुण्यातील बालेवाडी येथे असलेल्या प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांच्या ‘ऑर्चीड ‘ या हॉटेलवर पुणे महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.या प्रकारामुळे हॉटेल महापालिकेने ताब्यात घेतल्याचे वृत्त पसरताच हॉटेल वर्तुळात खळबळ उडाली .
सन २००८ पासून या हॉटेल ने तब्बल १६ कोटी ३८ लाख १७ हजार १६६ रुपयांचा मिळकत कर ठकविला अशी माहिती प्रशासन अधिकारी वैभव कडलग आणि गिरीश पत्की यांनी दिली .दीपक राऊत श्रीकांत देशपांडे, राजकुमार टन्नू , राजेश उपरपेल्ली, गणेश मांजरे , आणि पालिकेच्या अधिकारी पथकाने आज दुपारी हि कारवाई केली . करोडोंचा मिळकतकरचुकवल्याने ही कारवाई करण्यात आली असून एकूण मिळकतकर थकबाकीवर दरमहा 2 टक्के शास्तीकर आकारण्यात आले असल्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.अनेकदा नोटीसा दिल्या. एवढेच नव्हे तर आता त्यांना आपण पोस्टडेटेड चेक तरी द्या अशी देखील वनांती केली मात्र त्यांनी असमर्थता दाखविली त्यामुळे नाईलाजास्तव सील लावून हे हॉटेल आपण ताब्यात घेतल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले .
दरम्यान हॉटेलच्या प्रशासनाने असे म्हटले आहे कि , हॉटेल चालूच असून पालिकेने मिळकत कराबाबत मतभेद असताना रेस्टोरंट ला सील केले आहे . यामुळे रेस्टोरंट आज सायंकाळी आणि कदाचित उद्या बंद राहू शकेल पण अन्य हॉटेलच्या सर्व सुविधा चालू आहेत . ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची आमची जबाबदारी आम्ही पार पाडू .