Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रख्यात सिनेअभिनेते ओम पुरी यांचे निधन

Date:

 

मुंबई – प्रख्यात सिनेअभिनेते पदमश्री आणि सलाम पुणे पुरस्काराचे मानकरी , नेहमी परखड कटुसत्य बोलण्याने माध्यमांमध्ये आणि जनमानसात वादाचा विषय बनलेले…  ओम पुरी यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सकाळी निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान आणि बॉलीवूडमधील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून ओम पुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

घाशीराम कोतवाल चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयक्षेत्रात पर्दापण केले होते. आक्रोश हा ओम पुरी यांचा पहिला गाजलेला चित्रपट होता. केंद्र सरकारने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७३ बॅचचे ते विद्यार्थी होते. अभिनयाबरोबरच त्यांचा भारदस्त आवाज व संवादफेक कौशल्य अप्रतिम होते. अर्धसत्य चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ओम पुरी यांनी हॉलीवूडमध्येही आपली छाप सोडली होती. अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.

अभिनयाबरोबर सामाजिक विषयांवरही ते भाष्य करत. अनेकवेळा ते यामुळे वादातही अडकले होते. १९९३ मध्ये त्यांनी  नंदिता पुरी यांच्याशी विवाह केला होता. २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांना इशान नावाचा एक मुलगा आहे. ओम पुरी यांनी ब्रिटन, अमेरिकेतील चित्रपटांमध्येही कामे केली. आस्था, हेराफेरी, अर्धसत्य, चक्रव्यूह, चायना गेट, घायल यासारख्या विविध चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

अनेक गंभीर भूमिका साकारणारे ओम पुरी विनोदी भूमिकाही तितक्याच लिलयापणे निभावत. हेराफेरी चित्रपटातील विनोदी भूमिकेसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. एक कलासक्त अभिनेता हरपल्याने अनेकांनी दुख: व्यक्त केले आहे. अभिनेत्याला शोभेल असे रूप नसतानाही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भूमिका मिळवल्या.

अमरीश पुरी, नसरूद्दीन शहा, शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर त्यांनी अनेक कलात्मक चित्रपटात काम केले. त्यांनी १९८० मध्ये आलेल्या भवानी भवई, १९८१ मधील सद्गती, १९८२ मध्ये अर्धसत्य, १९८६ मध्ये मिर्च मसाला आणि १९९२ मध्ये आलेल्या धारावी चित्रपटात त्यांनी उत्कृष्ठ काम केले होते. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी ओम पुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला:मुंबईसह 29 महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी

मुंबई:राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. त्यात...

आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधकांचा भडिमार:यादी दुरुस्त करा, मगच तारखा जाहीर करा

मुंबई-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आजचा दिवस अत्यंत निर्णायक...

सरकारी भूखंड हडपण्याप्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल का होत नाही

पुणे- मुंढवा परिसरातील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणाने...

आज महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार:दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

सर्वच पक्ष, संभाव्य उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज...तर राज्यात...