पुणे- नोबेल हॉस्पिटलने रूग्णांना हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन्स (एचएआय) पासून वाचवण्यासाठी इनफ्यूजन प्रणाली अंगीकारली आहे. ज्यामुळे रूग्णांना रुग्णालयात होणार्या कोणत्याही संक्रमणापासून वाचवले जाऊ शकते.
हैद्राबादमध्ये मध्ये एका ६ वर्षाच्या मुलचा दूषित द्रवपदार्थामुळे (संक्रमण)मुत्यू झाल्याची घटना उल्लेखनिय आहे.नोबेल हॉस्पिटलचे एक्झिक्य़ूटिव ङाईरेक्टर डॉ. एच. के साळे म्हणाले कि, रूग्ण सुरक्षा हा आज वैद्यकीय क्षेत्रातील गंभीर काळजीचा विषय बनला आहे. रूग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारचे संक्रमण होण्याची दाट शक्यता असते. अनेक वैद्यकीय अहवाल असे सूचित करतात कि वैद्यकिय त्रुटींची गंभीर दखल घेत रूग्णालयात दाखल होणार्या रूग्णांची सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची प्रामुख्याने गरज आहे.
रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे किंवा त्यांच्या मुत्युचे प्रमुख कारण हे (एचएआय) संक्रमण असु शकते. दहापैकी एका रूग्णास एचएआएचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जागतिक आकडेवारी अनुसार १.४ मिलियन रूग्ण एचएआय संक्रमण ग्रस्त आहेत. मूत्रमार्गात संक्रमण, शस्त्रक्रियवेळी होणारे संक्रमण,श्वसन संक्रमण,न्यूमोनिया, रक्त संक्रमण, त्वचा (विशेषत: बर्न्स), लैंगिकदृष्ट्या संक्रमण, आणि मध्यवर्ती मज्जासंस्था संक्रमण अशे एचएआय ह्या संक्रमणाचे विविध प्रकार आहेत.
एचएआयसाठी प्रतिजैविक उपचार पद्धत्ती फायदेशीर ठरते. भविष्यात होणार्या गंभीर समस्यांचे समाधान ह्यामुळे मिळते. परंतु ही उपचार पद्धत्ती खुप कठिन आहे. सलाईनद्वारे औषधे देताना संक्रमणाबाबात सावध राहने गरजेचे आहे. इनफ्यूजन थेरपी संक्रमण रोकण्यामध्ये ८० टक्के मदत करते. एका अध्ययना अनुसार रुग्णालयात घालवलेल्या कालावधीमुळे संक्रमण होते. ह्यामुळे उपचार पद्धत्तीत ही विलंब होतो. रुग्णांना जीव आणि पैसा वाचविण्यासाठी संक्रमण उपचार प्रणाली खुप गरजेची आहे.