Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘संघमित्र सन्मान दृष्टी पुरस्कार’ घनश्याम कासट यांना, ‘लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार’ विनयकुमार देशपांडे यांना प्रदान

Date:

पुणे-
​’राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या ‘मार्फत आळंदीत चालविण्यात येणाऱ्या  ‘जागृती स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स ‘च्या शाळेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात ‘मॉडेल स्कुल ‘ उभाराव्यात ‘असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ . नीलम गोऱ्हे यांनी केले .
‘राष्ट्रीय दृष्टीहीन संघ’ (महाराष्ट्र) या संस्थेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे ‘संघमित्र सन्मान दृष्टी पुरस्कार’
​ घनश्याम कासट यांना आणि ‘लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती  पुरस्कार’

विनयकुमार देशपांडे यांना  आमदार आणि शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आणि अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
​आळंदी येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ . नीलम गोऱ्हे  बोलत होत्या . ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष महादेव गुरव हे होते .
दृष्टीहीन बांधवांच्या मागण्यांचे निवेदन यावेळी डॉ  नीलम गोऱ्हे ,अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांना सुपूर्द करण्यात आले .
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ (महाराष्ट्र) चे अध्यक्ष महादेव गुरव, वसंत हेगडे ( सचिव), रघुनाथ बारड (उपाध्यक्ष), हरी भालेराव (कोषाध्यक्ष) , शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे , मुख्याध्यापक मंगल वानखेडे, तसेच ​जी.एम. मगर ,अमोल वीरकर ​उपस्थित होते. 11,111 ​रुपये ​रोख, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रविवारी 11 जून 2017 रोजी ​दुपारी  ‘जागृती अंध मुलींची शाळा संकुल’, चर्‍होली खुर्द, ( ता. खेड, जि. पुणे) येथे हा कार्यक्रम झाला.
 घनश्याम हिरालाल कासट यांनी त्यांच्या माहेश्वरी आधार सभा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कृष्णार्पण सेवा​’ संस्थेअंतर्गत  विदर्भातील अंध-अपंगांच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी बहुमोल कार्य केले आहे.
विनयकुमार दत्तात्रेय देशपांडे यांनी सामाजिक बांधिलकेचे भान राखून त्यांच्या पुनर्वसन संकल्पनेअंतर्गत मराठवाड्यातील अनेक अंध व्यक्तींना रोजगार-स्वयंरोजगार मिळणेकामी सर्वतोपरी सहकार्य करून त्यांचे पुनर्वसन साध्य केले आहे. अशाप्रकारे त्यांनी या विशेष गरजा असलेल्या अंध-अपंग या सामाजिक घटकाला आधारस्तंभ होऊन इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे. या बहुमोल कार्याची नोंद घेऊन घनश्याम हिरालाल कासट​,​विनयकुमार  देशपांडे (जालना) यांना​गौरविण्यात आले .
​यावेळी बोलताना डॉ . नीलम गोऱ्हे म्हणाल्या ,’राष्ट्रीय दृष्टिहीन संघ ‘ संस्थेने दृष्टिहीन बांधवांसाठी ४० वर्षे उल्लेखनीय काम केले आहे . समाजात दृष्टिहीन बालके जन्माला आली तर पालकच त्याची वाच्यता करीत नाहीत ,अशी परिस्थिती असताना दृष्टिहीनांच्या शिक्षणासाठी या संस्थेचे काम आदर्शवत आहे . आळंदीतील या शाळेच्या धर्तीवर राज्यात ‘मॉडेल स्कुल ‘उभी राहतील यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत . दृष्टीहीन बांधवांच्या शिक्षणासंबंधी समस्या सोडविण्यासाठी आम्ही अपंग कल्याण आयुक्तांसमवेत बैठक घेऊन प्रत्येक समस्येचे समाधान करण्यासाठी पावले उचलू ‘
यावेळी डॉ गोऱ्हे यांनी जागृती शाळेच्या ब्रेल पुस्तकांसाठी आणि संगणकासाठी अडीच लाखाचा निधी आमदार निधीतून जाहीर केला . शाळेचे अनुदान आणि वाढीव विद्यार्थिनींच्या मान्यतेसाठी आपण प्रयत्न करू ‘असेही त्यांनी सांगितले . यावेळी बोलताना राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील म्हणाले ,’काही शाळा केवळ अनुदानासाठी चालतात .त्या पार्श्वभूमीवर जागृती शाळेचे काम गुणवत्तापूर्ण आहे . वयाच्या पाचव्या वर्षपर्यंतचा गट अपंग कल्याणासाठी महत्वाचा असून या वयोगटासाठी  शासनाच्या योजना वाढाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत . ​

युवा महोत्सव आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात राज्यभरातून सुमारे 300 अंध व्यक्ती सहभागी झाले.सुमारे 172 गरजू अंध विद्यार्थ्यांना

​ साडेतीन लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप यावेळी करण्यात आले . ​

13 व्या अंध कल्याण युवक महोत्सवात ​झालेल्या  विविध स्पर्धांतील (सुगम गायन व वक्तृत्व, बे्रल निबंध लेखन, सांघीक वादविवाद, स्वरचित काव्यवाचन, प्रश्न मंजुषा, बुद्धीबळ) विजेत्यास बक्षीसे वितरित करण्यात आले. 18 ते 35 वयोगटांमधील दृष्टीहीन युवक-युवती या महोत्सवात सहभागी झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....