पुणे- पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची लोकसभेच्या अंदाज समितीवर (Committee on Estimates) चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. ही निवड एक वर्षासाठी असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निवडीची घोषणा केली. खासदार बापट हे 1 मे 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत एस्टिमेट कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. या समितीमध्ये 30 खासदारांचा समावेश आहे. लोकसभेमध्ये सादर झालेल्या विविध प्रकारच्या अंदाजपत्रकाची छाननी करणे. त्याची तपासणी करणे व केंद्र सरकारला सूचना करणे. यासाठी 1950 पासून ही समिती अस्तित्वात आली. प्रशासकीय सुधारणा सुचविणे. अंदाजपत्रकाच्या मर्यादेत खर्च झाला की नाही ? याची पाहणी करणे. प्रशासनाची कार्यक्षमता व त्याचे अर्थकारण याविषयी सल्ला देणे व अंदाजपत्रका बाबत धोरणात्मक प्रस्ताव देणे. अशा प्रकारची कामे ही समिती करते. यापूर्वी भाजपा नेते मुरली मनोहर जोशी या समितीचे अध्यक्ष होते.