अभिनेता सोनू सूद नुकताच कटिहार अभियंता ला भेटला ज्याने आपली नोकरी सोडली आणि आता अनाथ मुलांसाठी शाळा सुरू करतोय आणि त्याचे नाव” सोनू सूद ” ठेवले आहे. अभिनेता सोनू सूद या नवीन इमारतीचा उपयोग आणि वंचित मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी करणार आहे. फेब्रुवारीमध्ये सोनू सूदने 27 वर्षीय बिहार अभियंता बिरेंद्र कुमार महातो हा तरुण अनाथ मुलांसाठी शाळा उघडण्यासाठी आपली पूर्णवेळ नोकरी सोडतो हे वाचून तो आश्चर्यचकित झाला आणि या तरुणाने या शाळेचं नाव सोनू सूद ठेवलं ! 110 मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांना जेवण देण्याचा या महत्त्वपूर्ण कामाने सोनू प्रेरित झाला आणि सोनू ने महतो आणि शाळेतील मुलांची भेट घेतली.
शाळेतील मुलांच्या गरजा समजून घेण्यासाठी या अभिनेत्याने महतोसोबत खास वेळ घालवला. रेशनपासून ते दर्जेदार शिक्षणापर्यंत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी सोनू प्रयत्न करणार आहे. सोनू सूदने या शाळेसाठी नवीन इमारतीचे काम सुरू केले असून जेणेकरून अनेक वंचित मुलांना येथे राहता येईल आणि शाळेत प्रत्येक मुलासाठी जेवण उपलब्ध होईल याची खात्री घेतली जाणार आहे.
” मुलांना शिकवून गरिबीचा सामना करणं हा एक उत्तम मार्ग आहे. समाजातील उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षित करणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरून त्यांना नोकरीच्या अधिक चांगल्या संधी मिळतील. उच्च शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही काम करत आहोत. त्यांच संगोपन उत्तम रित्या व्हावं आणि त्यांचा विकास व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. ही शाळा देखील वंचित मुला साठी एक रात्र निवारा आहे ” अस सोनू सांगतो. सध्या सूद देशभरात सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत आणि हे नक्कीच उल्लेखनीय आहे.