मुंबई (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या सी.सी. आर. टी. च्या ज्युनियर सिनियर फेलोशिप निवड समितीवर महाराष्ट्रातून लोककला अकादमीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे यांची सदस्य पदी निवड झाली.
डॉ.शिवाजी वाघमारे हे नांदेड जिल्ह्यातील गवळेवाडी, या छोट्याशा खेडेगावातील असून ते एक उत्तम प्रामाणिक कलावंत व अभ्यासक आहेत त्यांनी शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर जनजागृतीचे कार्य केले त्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी, पर्यावरण विभाग. सॉंग अँड ड्रामा भारत सरकार .अशा सर्व विभागाच्या माध्यमातून एड्स जन जागृती, बेटी बचाव बेटी पढाव, पर्यावरण साक्षरता, व्यसनमुक्ती महिला सक्षमीकरण. कुपोषण इत्यादी विषयावर महाराष्ट्रभर जनजागृतीचे कार्य केले. तसेच सांस्कृतिक संचालनालय आयोजित तमाशा, कीर्तन, पोवाडा शिबिराचे चार वेळा समन्वयक म्हणून काम सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासन व शाहीर अमरशेख अध्यासन. मुंबई विद्यापीठ, यांच्या माध्यमातून लोककला संशोधनाचे तीन वर्ष काम तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर भारत सरकार, संगीत अकादमी महोत्सव दिल्ली, अखिल भारतीय लोककला संमेलन मुंबई. अखिल भारतीय साहित्य संमेलन. जागतिक आठवा ओलंपिक थिएटर महोत्सव. एन एस डी दिल्ली. इ. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं समन्वयक म्हणून काम. अशा विविध महोत्सवांमधून महाराष्ट्रातील व संपूर्ण भारतातील लोककलांचा व लोककलावंतांचा तसे लोकसाहित्यातील मोठं मोठ्या अभ्यासकांचा खूप जवळून परिचय झाला व मार्गदर्शन मिळाले. मग पुढे लोककलेच्या क्षेत्रांमध्येच मुंबई विद्यापीठातून पीएचडी मिळवली.आणि लोककला अकादमी. मुंबई विद्यापीठ येथे दोन . वर्षा पुर्वी सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली. वरील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान त्यांचं कार्य ,कष्ट जिद्द मेहनत पाहून आज भारत सरकारच्या सर्वोच्च मानणाऱ्या सी सी आर टी(center for cultural Resources and Traning) फेलोशिप कमिटीवर महाराष्ट्रातून नियुक्ती झाली.या सेंटरच्या माध्यमातून विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना भारत सरकार वरिष्ठ आणि कनिष्ठ फेलोशिप दिली जाते अश्या निवड समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येक स्तरांमधून आज प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वाघमारे यांचे कौतुक होत आहे.