मुंबई. बॉलिवूडमधून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनयाची सुरुवात करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याच्या घरातील नोकराने सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिला आणि पोलिसांना या घटनेची सूचना दिली. सुशांतला महेंद्रसिंग धोनीचा जीनवपट ‘एम. एस.धोनी’ चित्रपटातून खरी ओळख मिळाली होती.
सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीमधून केली होती. सुशांतने सर्वात आधी ‘किस देश में है मेरा दिल’ नावाच्या मालिकेत काम केले होते, पण त्याला खरी ओळख एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘काय पो छे’मधून केली होती. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमांस’ आणि भारतीय क्रिकट कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक ‘एम एस धोनी’, आमिर खानसोबत ‘पीके’ आणि ‘छिछोरे” चित्रपटात काम काम केले होते. विशेष म्हणजे, छिछोरे चित्रपटात सुशांतने आत्महत्या न करण्याचा संदेश दिला होता. पण, त्यानेच आज आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
12 चित्रपटात केले काम
काय पो छे, शुद्ध देसी रोमांस, पीके, डिटेक्टिव व्योमकेश बख्शी, एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी, राब्ता, वेल्कम टू न्यू यॉर्क, केदारनाथ, सोनचिड़िया, छिछोरे, ड्राइव आणि दिल बेचारा चित्रपटात काम केले.
मागील काही दिवसात बॉलिवूडमधील अनेक कलाकार जग सोडून गेले आहेत. एप्रिल महिन्यात इरफान खान आणि ऋषी कपूरसारख्या मोठ्या कलाकारांचे निधन झाले. तर, नुकतच सिंगर आणि म्यूजिक कंपोजर वाजिद खानचे 42 व्या वर्षी निधन झाले.
8 जूनला माजी मॅनेजरने केली आत्महत्या
पाच दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सलियनने 8 जूनला मुंबईतील एका इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दिशाने मुंबईच्या मालाडमधील 14 मजली इमारतीवरुन उडी मारली.