नवी दिल्ली- भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी ( IAS) संपदा मेहता यांची नुकतीच देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या,केंद्र सरकारच्या श्रीमती.निर्मंला सितारामन, यांच्या अखत्यारीत येणाऱ्या अर्थमंत्रालयात,संचालक, राजस्व (महसूल) विभाग,वित्त मंत्रालय,भारत सरकार या पदावर नवी दिल्ली,येथे नियुक्ती करण्यात आली आहे.या भुषणास्पद नियुक्ती बद्दल त्यांचे सलाम पुणे च्या वतीने अध्यक्ष शरद लोणकर यांनी मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन,व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत ज्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक करून त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांमधील कोणी घेतलेली अशी उत्तुंग भरारी निश्चितच आनंद देणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संपदा मेहता यांनी या पुर्वी महत्वाच्या मुंबई जिल्हाधिकारी,GST Joint Commissioner ( सह आयुक्त ), तसेच पुणे, जळगाव, गडचिरोली, नाशिक,हीगोंली, नवी मुंबई ,कोकण विभाग, ई.ठीकाणी विविध पदांवर काम केले आहे.