῀दिल्ली, मुंबई, अजमेर, भुबनेश्वर, गांधीनगर, बेंगळुरू आणि कोचीनमधील व्यापारी, औद्योगिक, निवासी आणि सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहकांकडून भरपूर प्रतिसाद ῀
῀दरवर्षी जवळपास ५०,००० रुपयांची बचत, २५ वर्षांमध्ये होईल एकूण १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त बचत (५ किलोवॅट क्षमतेच्या इंस्टॉलेशनमुळे) ῀
futureready भारत निर्माण करण्यासाठीटाटा पॉवर ही देशातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवर शुद्ध ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून सुरु करण्यात आलेल्या रुफटॉप सोलर या सेवेचा देशातील ९० शहरांमध्ये विस्तार करण्यात टाटा पॉवरला यश मिळाले आहे.
व्यापारी, औद्योगिक, निवासी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व मोठ्या विभागातील ग्राहक आपल्या ऊर्जा गरज पूर्ण करण्यासाठी एक विश्वसनीय आणि शाश्वत उपाय तसेच खर्चामध्ये खूप मोठी बचत करू शकेल अशी सुविधा म्हणून सौर ऊर्जेचा वापर सुरु करत असताना टाटा पॉवर आपल्या या सेवेचा विस्तार करत आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.
ग्राहकांच्या गरजेनुसार बदल करता येतील अशा रुफटॉप सोलर सुविधांची संपूर्ण भारतभरात सुरुवात सप्टेंबर २०१८ पासून झाली. तेव्हापासून आजतागायत या सेवेमुळे समाधानी आणि आनंदी असलेल्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे वीज ग्राहकांच्या सर्व विभागांमध्ये टाटा पॉवर रुफटॉप सोलर सुविधांचे मोल देखील वाढत आहे.
भारतातील आघाडीचे पॉलिस्टर यार्न निर्माते भिलोसा इंडस्ट्रीजचे अपूर्व झवेरी यांनी सांगितले, “आमच्या व्यवस्थापनाने संपूर्णपणे शुद्ध ऊर्जा वापरण्याचा संकल्प घेतल्यापासून एक वर्षापेक्षाही कमी काळात आम्ही आमच्या सिल्वासा येथील प्लांटमध्ये जवळपास ३ मेगावॅट क्षमतेचे रुफटॉप सोलर युनिट बसवले आहे. पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि खर्चातील बचत या दोन्ही दृष्टीने हल्लीच्या काळात आम्ही केलेली ही एक सर्वात चांगली गुंतवणूक आहे. आजतागायत आम्ही ४.५ मिलियन युनिट्सपेक्षा जास्त वीज वाचवण्यात यश मिळवले असून आता अजून ३ मेगावॅट क्षमतेचे युनिट आम्ही वाढवत आहोत. आम्हाला पक्की खात्री आहे की टाटा पॉवरकडून आम्हाला असेच मूल्य पुढे देखील मिळत राहील.”
त्याचप्रमाणे बालाजी वेफर्स या गुजरातमधील राजकोट येथील स्वदेशी फूड प्रॉडक्ट्स कंपनीने सांगितले की, त्यांनी ७ लाख युनिट्स वीज आणि जवळपास ५० लाख रुपये खर्च यांची बचत करण्यात यश मिळवले असून वलसाड आणि इंदोर येथील त्यांच्या कारखान्यांमध्ये देखील रुफटॉप सोलर बसवण्यासाठी गुंतवणूक केली जात आहे. बालाजी वेफर्सचे मार्केटिंग हेड श्री. जय सचदेव म्हणाले, “टाटा पॉवर रुफटॉप सोलारमधून मिळणारे मूल्य लक्षणीय असून आम्ही भविष्यातही यामध्ये गुंतवणूक करत राहू.”
टाटा पॉवरचे चॅनेल पार्टनर श्री. दिनेश लखानी यांनी भर देऊन सांगितले की, रुफटॉप सोलर हा ऊर्जेचा मौल्यवान स्रोत आहे जो वातावरणातील बदलविरोधात लढू शकतो. ही प्रेरणा घेऊन श्री. दिनेश हे या सेवा देण्यासाठी गेल्या ७ वर्षांपेक्षाही अधिक काळ टाटा पॉवरसोबत काम करत आहेत. १० पेक्षा जास्त मेगावॅट क्षमतेच्या रुफटॉप सिस्टिम्स त्यांनी याआधीच इन्स्टॉल केल्या असून भविष्यातही कार्बन उत्सर्जन कमी करून अधिक हरित आणि शुद्ध भविष्य निर्माण करण्यात योगदान देण्याचे त्यांचे उद्धिष्ट आहे.
बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे प्लांट हेड श्री. अबिद सिद्दीकी यांनी सांगितले की, रुफटॉप सोलर पॅनेल्सचे महत्त्व वाढवणारी सर्वात मोठी बाब म्हणजे हा ऊर्जेचा शुद्ध स्रोत असून त्याला फारच कमी देखरेखीची आवश्यकता असते.
नवीन विचार आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार सर्वात आधी करणारे असल्यामुळे व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांचे सकारात्मक अनुभव वीज क्षेत्रात अनेक मोठे बदल घडवून आणत आहेत. या दोन श्रेणींमधील ग्राहकांना सर्वसामान्यतः खर्चाचे पुरेपूर मूल्य मिळावे तसेच त्यांची पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उद्दीष्ट्ये पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा असते.
टाटा पॉवरचे सीईओ व एमडी श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “सोलर रुफटॉप्समुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांऐवजी कमी खर्चाचा आणि शुद्ध ऊर्जेचा पर्याय मिळतो असे नाही तर ही सुविधा अतिशय विश्वसनीय देखील आहे. आमच्या ग्राहकांनी मोठ्या संख्येने आरटीएस घेतल्यामुळे आम्हाला खात्री आहे की, संपूर्ण देशभरात शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये ऊर्जा उप्लब्धतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यात आमच्या सोलर रुफटॉप सुविधा खूप मोलाची भूमिका बजावतील.”
टाटा पॉवरचे (रिन्यूएबल्स) प्रेसिडेंट श्री. आशिष खन्ना यांनी सांगितले, “ग्राहकांना शुद्ध आणि हरित ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करवून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असा पर्याय जो खर्चामध्ये बचत करणारा असेल शिवाय ऊर्जा संवर्धनातही त्यांना मदत करेल. आरटीएसमुळे आमच्या कंपनीचे ‘लायटिंग अप लाइव्हस‘ हे उद्धिष्ट नक्की पूर्ण होईल.”
रुफटॉप सोलर इंस्टॉलेशन्सना भारतातील अनेक निवासी भागांमध्ये ग्रीड समानता मिळत आहे. विजेच्या किमती सतत वर-खाली होत राहतात. परंतु सोलर रुफटॉप्समध्ये निर्माण केल्या जाणाऱ्या विजेची किंमत सहज मोजली जाऊ शकते. इतकेच नव्हे तर, पुढील दहा वर्षात वीज निर्मितीसाठी किती खर्च येणार आहे हे देखील आपण सहज मोजू शकतो.
म्हणूनच टाटा पॉवरचे ग्राहक असलेल्या समर्थ आंगन, मालाड (१८० किलोवॅट), यारो युका विंका, चांदिवली (२४० किलोवॅट), कार्डिनल ग्रशियस हॉस्पिटल्स, मीरा रोड (२२० किलोवॅट), प्लॅनेट गोदरेज सीएचएस महालक्ष्मी पूर्व (६० किलोवॅट), विवर्क्स, साकीनाका (३० किलोवॅट) यासारख्या निवासी गृहसंकुलांना तसेच कंपन्यांना टाटा पॉवर रुफटॉप सोलरमुळे वीज खर्चात खूप मोठी बचत करता येत आहे. हे सर्व जागरूक नागरिक त्यांच्या वीज बिलांमध्ये लक्षणीय बचत करण्याच्या बरोबरीनेच किती वीज वापरली गेली हे मोजून त्याची नोंद देखील ठेवू शकत आहेत.
भारतातील वीज क्षेत्रात आरटीएसची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्यामुळे देशात अपारंपरिक किंवा हरित ऊर्जा वापराचे प्रमाण देखील वाढत आहे. टाटा पॉवरने ३७५ पेक्षा जास्त मेगावॅट क्षमतेचे रुफटॉप प्रकल्प बसवले असून यापैकी काही प्रकल्प गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू यासारख्या औद्योगिकीकरणात सर्वात पुढे असलेल्या राज्यांमध्ये आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, बडोदा, दिल्ली, गुरगाव, आग्रा, लखनौ, चंदीगड, वाराणसी, गुवाहाटी, कोलकाता, धनबाद, पुरी, विझाग, वेल्लोर, म्हैसूर, कोइम्बत्तूर आणि चेन्नई यासारखी देशातील महत्त्वाची शहरे देखील सोलर रुफटॉप सुविधा अंगिकारण्यात आघाडीवर आहेत.
देशात १३ राज्यांमध्ये टाटा पॉवरने युटिलिटी स्केल प्रोजेक्ट्स देखील उभारले असून त्यांची एकूण क्षमता जवळपास २.७६ गिगवॅट आहे. २०१७ मध्ये या कंपनीने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कारपोर्टमधे २.६ मेगावॅट क्षमतेचा सोलर रुफटॉप प्लांट सुरु केला. हे देशातील सर्वात मोठे सौर उर्जेवर चालणारे कारपोर्ट आहे.