पुणे- महानगरपालिका पुणे शहरात एक उद्यान तयार करीत असून त्या उद्यानात लावण्यासाठी पुणे महानगरपालिका १४ लाखांचे झाड खरेदी करणार आहे. पुणेकरांच्या पैशांची चाललेली उधळपट्टी थांबवण्यासाठी तसेच पुणे महानगरपालिकेने पुणे शहरांमधील तलावामध्ये नसलेली जलपर्णी काढण्यासाठी निविदा काढली आहे या सर्व प्रकारात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचे दिसत आहे तरी या निविदाप्रकियेची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी. या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले की महापौरांनी जलपर्णी निविदेच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा आणि त्यातील दोषींवर कारवाई करावी. स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा आव आणून सत्तेत आलेल्या भाजपाने पुणे महानगरपालिकेत फक्त भ्रष्ट्राचार चालविलेलां आहे. जिथे जलपर्णी च नाहीये तिथे जलपर्णी काढण्याची निविदा काढली जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये देशी झाडाना प्राधान्य देण्याचा नियम असताना सुध्दा परदेशी झाडे आणण्याचा घात घालण्यात येत असून त्या झाडांची किंमत १४ लाख रुपये आहे. पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी भाजपाने त्वरीत थांबवावी. यावेळी विरोधीपक्षनेते दिलीप बराटे, निलेश निकम,रुपाली चाकानाकर , ,प्रदीप देशमुख,विजय खराडे यांची भाषणे झाली. यावेळी प्रशांत जगताप, महेंद्र पाठारे, श्रीकांत पाटील,राकेश कामठे,संतोष नांगरे,नंदा लोणकर,नितीन कदम ,गणेश नलावडे, वासंती काकडे, राजेंद्र खांदवे, गफुर पठाण,सुमन पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणेकरांच्या पैशाची लुट भाजपाने थांबवावी – चेतन तुपे पाटील
Date:

