पुणे-“मी ओबीसी असल्यामुळे मला सभागृहात बोलू दिले जात नाही” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी केला. गुरुवारी (दि.19) पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना महापौरांनी ससाणे यांना बोलण्याची संधी न दिल्याने ,’महापौर मी हाथ वर करूनही आपण मला बोलू का देत नाही ,आपण कायम असे का वागता ,त्यापेक्षा मी निषेध करून सभात्याग करतो असे सांगत ससाणे यांनी सभात्याग केला.
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधून ससाणे निवडून आले आहेत. आज पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभेत शहरातील खड्ड्यावर चर्चा सुरू होती. त्यावर बोलण्यासाठी ससाने यांनी वारंवार हात वर करूनही त्यांना बोलण्याची संधी नाकारली. त्यामुळे त्यांनी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले.
त्यानानातर त्यांनी तातडीने महापौर मुक्ता टिळक यांना नगरसचिव कार्यालयामार्फत पत्र दिले ,’मी ओबीसी असल्यामुळेच मला बोलू दिले जात नसल्याचे त्यात म्हटले आहे . सभागृहात मला बोलू दिले जात नाही, त्यामुळे माझ्या प्रभागातील समस्या सोडवण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी त्यात नमूद केले आहे .काय आहे हे पत्र पहा …