पुणे :
– पुणे शहराच्या विकास आराखड्यातून आवश्यक असलेली आरक्षणे उठवण्यात आली. पुणेकरांनी मतदानाला जाण्याआधी एकदा विकास आराखडा अवश्य वाचावा. विकास आराखड्याचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली. पुण्यात ते बोलत होते.
खासदार एड . वंदना चव्हाण ,आमदार अनिल भोसले इत्यादी उपस्थित होते
यावेळी वडगाव शेरीतील माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे शहर संघटक सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर करताना प्रभाग 2 मधून सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली.
ते पुढे म्हणाले की, आम्ही 162 जागेवर लढण्याची तयारी करत आहोत. परंतू अजूनही समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी सकारत्मक असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेला 25 वर्षानंतर आपण भाजपबरोबर सडत असल्याची प्रचिती आली आहे. पारदर्शकतेमुळे युती तुटल्याचे सांगितले जात असले तरी युती तुटण्याचे खरे कारण जागा वाटपाचे आहे.

