Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केंद्रीय मोटार वाहन नियमात केलेल्या शुल्क वाढीबाबत तीव्र आंदोलन

Date:

पुणे:
   पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने  केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियमात केलेल्या शुल्क वाढीबाबत निषेध व्यक्त केला आहे.याविषयी आज झालेल्या पत्रकार परिषदेला खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड.म. वि. अकोलकर,रिक्षा संघटना अध्यक्ष बापू धुमाळ, पुणे शहर ऑटो फेडरेशनचे प्रदीप धुमाळ,संतोष पांगारकर, अशोक केदारी, प्रसाद खरोटे,विजय रवळे तसेच शंभर रिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
    पुण्यात व जिल्ह्यात, पिंपरी -चिंचवडमध्ये पासष्ठ हजार रिक्षा चालक व मालक असून, त्यांच्यवर या दरवाढीमुळे आर्थिक बोजा पडणार पडणार आहे.
तरी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दरवाढीचा निषेध करत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामगार सेल व शहर राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा चालक व मालक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, ही दरवाढ मागे घेतली नाही तर या दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल,असे खासदार शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

     यावेळी बोलताना  ऍड.म. वि. अकोलकर,म्हणाले ही शुल्कवाढ असमर्थनीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिक्षा चालक-मालकांच्या हक्क अधिकार व हीत जपणारा पक्ष आहे. आमच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी,परिवहन खाते, राज्य व केंद्र सरकार यांना पत्रे दिली असून त्यांना ही शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. पुण्यात, जिल्ह्यात, पिंपरी -चिंचवडमध्ये पन्नास हजार सह्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारकडे पाठविणार आहे.२६ जानेवारी पर्यंत जर राज्यसरकारने याबाबतचे व मध्यवर्ती सरकारचे याबाबतचे पत्रक परत घेतले नाही तर सर्व रिक्षा चालक व मालक एकत्रित येऊन विरोध करतील. नोटबंदी मुळे आधीच श्रमजीवी वर्ग हैराण झाला आहे त्यातच आता या दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे.

परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई तर्फे केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियमातील विविध शुल्कात वाढ केली असून २९ डिसेंबर २०१६ पासून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. शिकाऊ लायसन्स 150 रु. तर फेर चाचणी 50 रु., वाहन चालक क्षमता 300 रु. लायसन्स जारी करणे 200 रु. आंतरराष्ट्रीय वाहन परवाना 1000रु. लायसन्स वर नवीन नोंद घेणे 500 रु. धोकादायक पदार्थाची वाहतूक करणाऱया वाहनांसाठी नोंद घेण्यासाठी 100 रु. लायसन्स नुतनीकरण 200 रु. मोटार ड्रायव्हींग स्कुलला मान्यता देणे अथवा नुतनीकरण करणे 1000 रु. मोटार ड्रायव्हींग स्कुलसाठी दुसरे प्राधीकार जारी करणे पाच हजार रु. लायसन्स पत्यावरील बदल करणे 200 रु. वरील शुल्क सर्व प्रकारच्या परवान्यासाठी राहतील.

मोटार सायकल, अपंग तसेच इतर वर्गाचे नुतनीकरण अथवा नवीन व्यवसाय प्रमाण संदर्भात अनुक्रमे 500, 500 व 1000 रु. तर दुय्यम प्रतीसाठी अनुक्रमे 300, 300 व 500 रु. इतके शुल्क राहील. सर्व प्रकारच्या वाहन नोंदणीसाठी त्यांच्या वर्गवारी नुसार नवीन नोंदणी नुतणीकरण व पुर्न नोंदणी यासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येईल. यामध्ये अपंग 50 रु. मोटार सायकल 300 रु. तीनचाकी 300 रु. खाजगी वाहन 600 रु. परिवहन 100 रु. मध्यम मालवाहू व मध्यम प्रवासी वाहनांसाठी प्रत्येकी 1000 रु. तर जड मालवाहू व जड प्रवासी वाहनांसाठी प्रत्येकी 1500 रु. शुल्क अदा करावे लागेल. आयात 2 चाकी वाहनासाठी 2500 तर चार चाकी वाहनाकरीता 500 रु. इतके शुल्क आकारण्यात येईल.

वाहन नोंदणीच्या दुय्यम नोंदणीसाठी अपंग 25 रु. मोटार सायकल व तीन चाकी प्रत्येकी 150 रु. खाजगी वाहन 300 रु. परिवहन मध्यम मालवाहू व मध्यम प्रवासी वाहनांसाठी प्रत्येकी वाहनांसाठी अनुक्रमे 1250 व 2500 रु. याशिवाय वर उल्लेख नसलेल्या वाहनांकरीता 1500 रु. वाहनातील फेरफार नोंदणी करीता वरील प्रमाणेच दर लागू राहतील.

वाहन भाडे कराराने देणे, तारण अथवा त्यावर बोजा चढविण्याकरीता मोटार सायकली साठी 500 रु. तीन चाकी साठी 1500 रु. तर मध्यम व जड वाहनाकरीता 3000 रु. तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण चाचणी शुल्क पुढीलप्रमाणे – दोन चाकी मॅन्युअल 200 रु स्वयंचलीत 400 रु. तीन चाकी मॅन्युअल 400 रु. तर स्वंयचलीत 600 रु. आणि जड व माध्यम वाहने मॅन्युअल 600 तर स्वयंचलीत वाहनासाठी 1000 रु. शुल्क घेण्यात येईल तर फिटनेस प्रमाणपत्र नुतणीकरण अथवा जारी करण्याकरीता 1500 रु. तर दुय्यम प्राधिकार पत्रासाठी सात हजार 500 रु. जारी करण्यात येईल. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी विलंबाने सादर होणाऱया वाहनांकरीता प्रती दिन 50 रु. अतिरिक्त शुल्क लागू होणार आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...