Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पूर्वतयारी न करता केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता वेठीस : चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर

Date:

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  आयोजित

‘नोटबंदी की जनतेची नाकाबंदी’ या विषयारील चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. ​सरकारच्या नोटबंदी निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती विरोधात जनआंदोलना​चा भाग म्हणून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ​

या चर्चासत्रामध्ये कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, विद्याधर अनास्कर आणि प्रा. एच. एम. देसरडा ​हे ​ मान्यवर सहभागी झाले होते. ​

​दि. ७ जानेवारी २०१७ रोजी, दुपारी ४ वाजता, सावित्रीबाई फुले सभागृह, लोहिया नगर,येथे या ​चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . ​

‘भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी  हजार व पाचशेचे चलन बंद करण्याचा  निर्णय सरकारने घेतला परंतु नियोजनशून्य व्यवस्थेमुळे सामान्य नागरिक, महिला, छोटा व्यावसायिक, शेतकरी यांची गैरसोय होत आहे . सामन्यांना हजार दोन हजार रुपयांसाठी रांगेत उभे राहावे लागत असून अनेकांना  आपला जीव गमवावा लागला.  नोटबंदीने सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात अश्रू आणले . गरीब आणि सर्वसामान्य जनता यात भरडली जात आहे. धनदांडग्यांकडे लाखो रुपयांच्या नव्या नोटा सापडत आहेत. भ्रष्टाचार थांबण्यापेक्षा अधिक बोकळण्याची  शक्यता आहे . नोटबंदी ऐवजी एकवेळ दारूबंदी केली असती तर लोकांनी सहन केले असते .५० दिवसांच्या आश्‍वासनानंतरही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही’, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केले .

​    विद्याधर अनास्कर म्हणाले,’ नोटबंदी करताना बँकिंग क्षेत्राला विश्वासात घ्यायला हवे होते. पूर्वतयारी न करता आणि विचारपूर्वक हा निर्णय घेतला नाही. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे . जिल्हा बँकांना विश्वासात घ्यायला  पाहिजे होते ते झाले नाही . कायदा आणि सुव्यवस्था जो पर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत काळ्या पैशाची निर्मिती बंद होणे अशक्य आहे . सोने , रिअल इस्टेट आणि परकीय विनिमय चलन  यावर आधी बंधने घालण्याची गरज आहे. करप्रणाली मध्ये देखील आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे ‘.
कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर,चर्चासत्रात बोलताना म्हणाले ,’ भ्रष्टाचार रोखण्यासाठी पंतप्रधानांनी  नोटबंदीचे पाऊल उचलले पण पूर्वनियोजन नसल्यामुळे सामान्य माणूस आणि अर्थव्यवस्था कोलमडली . नोटबंदीनंतर किती पैसे परत आले हे अजून जाहीर करू शकले नाही हि खेदाची बाब आहे. काळा पैसे म्हणजे कर बुडवलेला पैसा किंवा उत्पन्न ,सोने ,रिअल इस्टेट मध्ये गुंतवलेले , हवाला पद्धतीने देशाबाहेर पाठवलेले पैसे . सर्वप्रथम सोन्याच्या आयातीवर बंधन घालणे गरजेचे आहे .नोव्हेंबर मध्ये सोन्याची आयात दुप्पट झाली.  सरकारने काळ्या पैशावर कारवाई करू हे सांगितले पण प्रत्यक्षात ते होताना दिसत नाही. हा केवळ भ्रम आणि दिशाभूल आहे.  धनिकांवरती बंधने घालून काळा पैसे बाहेर आला पाहिजे आणि त्यासाठी परिणामकारक आंदोलन करण्याची गरज आहे’.
​  ​

यावेळी ‘बड्या घोषणा पोकळ दावे,अर्थव्यवस्थेचे वाजले दिवाळे’! या  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कांढण्यात आलेल्या  पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .

​  ​

यावेळी अंकुश काकडे , ऍड .म.वि. अकोलकर , रवींद्र माळवदकर अशोक राठी पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .

​  ​

खासदार ,शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी या चर्चासत्राबाबत माहिती देताना सांगितले ,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानकपणे ५००  व १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी काळापैसा नष्ट केला जात असेल, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निर्णयाचे स्वागत केले. परंतु दुर्देवाने या निर्णयामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीची कोणतीही पूर्वतयारी न करता अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत देशातील करोडो नागरिकांना प्रचंड आर्थिक तणावाला सामोरे जावे लागले. देशातील कृषी व्यवस्था मोडकळीस आली, कष्टकरी आणि असंघटीत कामागारांवर बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आली. शेतमालाचे भाव कोसळले, छोट्या व्यावसायिकांचे धंदे बंद पडले तर मोठ्या उद्योगांवर कामगार कपातीची वेळ आली. सामान्य माणसाकडेच काळा पैसा साठला आहे, या अविर्भावात केंद्र सरकारने त्यांना रांगेत उभे करून हैराण केले. देशामध्ये आर्थिक आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली. या विरोधात बोलणार्‍यांना देशद्रोही ठरविण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते’.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. ११: उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री...