पुणे :
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या २५० उमेदवारांच्या मुलाखतीं रविवारी पूर्ण झाल्या . शनिवारी आणि रविवारी मिळून ४९० मुलाखती झाल्या .
रविवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी साडे आठपासून रासकर पॅलेस( बिबवेवाडी ) येथे पर्वती ,कसबा ,हडपसर ,कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या.
इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात केलेल्या कामांचा आढावा दिला. अहवाल ,वैयक्तिक परिचय पत्रके सादर केली . इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीदरम्यान आपली मते मांडली . ते म्हणाले, आयात उमेदवारांना संधी देऊ नका आम्ही सक्षम उमेदवार आहोत तेव्हा आम्हाला संधी मिळावी . तन,मन ,धन आम्ही पक्षासाठी देऊ , मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा ,तुम्ही फक्त लढ म्हणा ‘ अशा भावनाही व्यक्त केल्या
. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार इच्छुक उमेदवारांना मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारले . इच्छुक महिला उमेदवारांची आणि तरुण इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती . बिबवेवाडी परिसरात आज इच्छुक उमेदवार , त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. सर्वानी ढोल ,ताशाच्या गजरात शक्ती प्रदर्शन केले .
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार , आणि पुणे शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, , आमदार ऍड जयदेवराव गायकवाड , माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी आमदार कमल ढोले-पाटील , दीपक मानकर , अण्णा थोरात , रवींद्र माळवदकर , प्रवक्ते अंकुश काकडे , अशोक राठी, कृष्णकांत कुदळे ,सुभाष जगताप , राकेश कामठे, शशिकांत तापकीर ,पंडित कांबळे , इक्बाल शेख , मिलिंद वालवाडकर , शैलेश बडदे , यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेतल्या गेल्या

