![मदर तेरेसांच्या मानवतेप्रती करुणेचा आदर्श घ्यावा :खासदार एड .वंदना चव्हाण](https://mymarathi.net/wp-content/uploads/2016/09/unnamed-7.jpg)
मदर तेरेसांच्या मानवतेप्रती करुणेचा आदर्श घ्यावा :खासदार एड .वंदना चव्हाण
राष्ट्रवादी पुणे कार्यालयात मदर तेरेसांना संत पद बहाल केल्याचा आनंद व्यक्त
पुणे :
मदर तेरेसा यांना संत पद बहाल करण्यात आल्याच्या घटनेचा आनंद राष्ट्रवादी पुणे कार्यालयात व्यक्त करण्यात आला .
. ‘मदर तेरेसा यांचे रुग्ण सेवेचे आणि मानवतेची उंची वाढविण्याचे कार्य अद्वितीय होते . सर्वानी मदर तेरेसांच्या मानवतेप्रती करुणेचा आदर्श घ्यावा ‘असे आवाहन खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांनी केले .
यावेळी मदर तेरेसा होम (ताडीवाला रस्ता ) येथील सिस्टर शेरवीन आणि पास्टर सॉलमन (पिंपरी ) यांच्या उपस्थितीत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेसमोर प्रार्थना म्हणण्यात आली आणि कॅण्डल लावण्यात आल्या . राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील सर्व पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम घेतल्याची माहिती नितीन डिसोझा यांनी दिली .
इक्बाल शेख ,रवींद्र माळवदकर,मोहनसिंह राजपाल ,अशोक राठी ,मदन वाणी ,राकेश कामठे ,मनाली भिलारे ,शीतल घाटगे उपस्थित होते