पुणे- मुंबईत परळ-एल्फिन्सटन स्थानकावर झालेली दुर्घटना हा प्रकार मोठा दुखः कारक असून याप्रकरणी तातडीने रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजीराव रस्त्यावरील जन आक्रोश मोर्चात सह्भागी झालेले असताना दिली आहे ..
मुंबईत एल्फिन्सटन रेल्वे स्थानकावर चेंगरा-चेंगरी होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुदैवी घटनेबद्दल पवार म्हणाले,’ बुलेट ट्रेनवर एक लाख कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा याच खर्चात रेल्वे स्थानकाचे मजबुतीकरण केले असते. प्रवाशांना पुरेशा सेवा सुविधा दिल्या असत्या तर, अशा दुर्घटना घडल्या नसत्या या खर्चात प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे , ही कामे करता आली असती.’ बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा देण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्यानेच सुरेश प्रभू यांच्या जागी पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रिपद दिले गेले असा आरोप पवार यांनी केला