पुणे :
अत्याधुनिक एलसीडी पॅनेल, स्पीकर्स आणि पक्षनेत्यांच्या फोटोची सजावट असलेले ३ प्रचाररथ आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात उतरवले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणुक कार्यालय, सेंट्रल पार्क हॉटेल, शिवाजीनगर येथे प्रचाररथाचे उदघाटन विनायक चाचर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औदुंबर खुने -पाटील, अशोक राठी, शिल्पा भोसले, मनाली भिलारे, शंकर शिंदे, रवी चौधरी उपस्थित होते.
पक्षाचे कार्यालय असलेल्या हॉटेल सेंट्रल येथे तिन्ही रथ कार्यकर्त्यांना दाखवण्यात आले आणि परिसरातील प्रभागात प्रचारासाठी पाठवण्यात आले.
प्रचाररथाचे वेळापत्रक पक्षाकडून तयार केले जात आहे. शिल्पा भोसले यांच्याकडे त्याची जबाबदारी देण्यात आली आहे.