पुणे, : माजी पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त महावितरणमध्ये सुशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात पुणे परिमंडलामधील बेस्ट प्रॅक्टीसेससह बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने डिजिटल बँकींग व इ-पेमेंट यावर सादरीकरण व माहिती देण्यात आली.
महावितरणच्या रास्तापेठ येथील सभागृहात सोमवारी (दि. 26) सुशासन दिनानिमित्त कार्यशाळा आयोजित केली होती. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. सुनील पावडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री. गोविंद शामराज यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेत मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाव्यवस्थापक श्री. अलोक गांगुर्डे यांनी वित्त व लेखा, अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे यांनी तांत्रिक तर सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. धैर्यशील गायकवाड यांनी मानव संसाधन संवर्गातील बेस्ट प्रॅक्टीसेसमधून महावितरणच्या एकूणच कामकाजातील गतीमानता व तत्परतेबाबत माहिती दिली. यावेळी बॅक ऑफ महाराष्ट्रचे श्री. आशुतोष लेले यांनी डिजिटल बँकींग व इ-पेमेंट यावर सादरीकरण केले व माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वसंत चव्हाण यांनी केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी आभार मानले. कार्यशाळेत कार्यकारी अभियंता श्री. गणेश एकडे, श्री. नरेंद्ग ताडे, श्री. चंद्गकांत डामसे, श्री. अमसिद्ध हुवाळे, श्री. दिलीप भोळे आदींसह अभियंता, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

