पुणे- जे बोलेल ते होईल ..अशी ख्याती प्राप्त झालेल्या खासदार संजय काकडे यांनी आज आपल्या वाढदिवशी आपला संकल्प जाहीर केला आहे . आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छ्या देण्यासाठी महापालिकेतील तब्बल ७२ नगरसेवकांनी काकडे पॅलेसवर हजेरी लावली . शिवाय कॉंग्रेस ,राष्ट्रवादी, शिवसेना ,मनसे च्या आजी माजी नगरसेवकांनी देखील इथे प्रत्यक्ष काकडे यांची भेट घेवून शुभेच्छ्या दिल्या. पुढील विधानसभेत एक हाती सत्ता भाजप मिळवेल ..शिवाय किती जागा मिळवेल ? हे त्यांनी आजच आपला संकल्प म्हणून सांगितले आहे . महापालिका निवडणुकी बाबत त्यांनी अशाच प्रकारचा संकल्प सोडला होता . आणि त्यांच्या संकल्पानुसार महापलिकेत भाजपला जागांची संख्या प्राप्त झाली होती . या पार्श्वभूमीवर काकडे यांच्या वाढदिवसाला आणि संकल्पाला राजकीय दृष्ट्या महत्व दिले जात आहे . पहा नेमके खासदार काकडे यांनी काय म्हटले आहे . ..