भाजपच्या गणेश बिडकरांकडे २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी

Date:

मोहोळ आणि बिडकर दोहोंच्या तक्रारीत एक कडी -मोबाईल.

भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी आहेत काय टार्गेट ?

यामागे दडलंय कोण ? येणार बाहेर.कि…

पुणे ः माजी महापौर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याच्या तक्रारीनंतर आता पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृहनेते आणि नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात काल गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात असल्यामुळे कोणीतरी माझी बदनामी करण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण पोलिसांकडे तक्रार दाखल करीत असल्याचे बिडकर यांनी तक्रारअर्जात नमूद केले आहे. नोंदवलेल्या तक्रारीनुसार, श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झाले असताना बिडकर यांच्या व्यक्तीगत मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉटसअप कॉल आला. हिंदीमिश्रित मराठीत बोलत असलेल्या व्यक्तीने प्रारंभी शिवीगाळ केली. तुला राजकीय मस्ती आली आहे आणि २५ लाख रूपये दिले नाहीत, तर तुझे राजकीय जीवन संपवून टाकेल, अशी धमकी या व्यक्तीने दिली. आता तुला राजकीय जीवनातून संपवण्यासाठी मी तुझी बदनामी सुरू करणार आहे, अशीही धमकी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने दिली. माझी राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण तक्रार दाखल करीत असल्याचे बिडकर यांनी सांगितले. ज्या क्रमांकवरून धमकीचा फोन आला तो क्रमांक पोलिसांनी तक्रारीत नोंदवून घेतला आहे.

मोबाईल हॅक प्रकरणाने राजकीय तसेच शासकीय वर्तुळाने घेतला धसका

गेल्या आठवड्यातच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून दोघा जणांनी व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या, अशी मागणी खंडणी खोरांनी केली होती. या प्रकरणी राजेश व्यास यांच्या तक्रारीवरुन संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोबाईल हॅक करून आपल्या नावाने आपल्याच परिचितांना खंडणी मागितली गेल्याचे मोहोळ यांनी म्हटले होते.मोबाईल हॅक प्रकरणाने अनेकांनी धसका घेतला आहे.मोबाईल हॅक बाबत आणि संभाषणातील आवाजाच्या बाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही

महत्वाच्या २ पदाधिकाऱ्यांनंतर आता नंबर असेल कोणाचा ?

महापालिकेतील मोहोळ आणि बिडकर हे दोघे महत्वाचे पदाधिकारी होते.भाजप चे महाराष्ट्रातील नेते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे म्हणून त्यांची ख्याती आहे अशा या दोहोंच्या बाबतीत असे प्रकार घडल्याने आता पुन्हा असा प्रकार घडेल काय ? असा प्रश्न उपस्थित निश्चित होणार आहे.एकूण ४ पदाधिकारी महापालिकेत ५ वर्षाच्या सत्रात महत्वपूर्ण पदाधिकारी राहिले आहेत.सायबर क्राईम ने शहरात अशा प्रकाराने मुसंडी मारल्याने पुढील काळात अतिशय सावधानता प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींना आणि सामान्य नागरिकांनाही घ्यावी लागणार आहे हे निश्चित.

कसबा विधानसभेनंतरच का ?

दरम्यान या प्रकारांचा आणि कसबा विधानसभा निवडणुकीचा काहीही संबध नसला तरीही हे दोन्ही प्रकार कसब्याच्या निवडणुकीनंतरच उघड झाले आहेत.याकडे विशेष अंगाने पाहण्याची गरज वाटत नसल्याचे म्हणणे मांडले जात असले तरी हा हलकासा कवडसा तपासला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.आरोपी पकडले जातील पण पुढचा तपास देखील समोर येणे राजकीय वर्तुळात महत्वाचे मानले जाते आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....