शिवशक्ती, चांदेरे संघ अजिंक्य

Date:

– पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धा
– महापौर मुरलीधर मोहोळ यांचे यशस्वी आयोजन

कोथरुड (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेच्या महापौर चषक स्पर्धेत आयोजित केलेल्या कबड्डी चषकात महिला गटात ‘शिवशक्ती’ने तर पुरुष गटात बाबूराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाने चित्तथरारक खेळ करत विजेतेपदावर नाव कोरले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेला कोथरुडकर कब्बडीप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यस्तरीय मॅटवरील या स्पर्धेची दिमाखात सांगता झाली.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या महिला गटातील रोमहर्षक अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या सुवर्णयोग स्पोर्ट्स क्लब संघावर (३३-३०) असा अटीतटीचा विजय मिळविला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही शिवशक्ती संघाच्या दुसरी फळीदेखील तितकीच ताकदीने लढली.

पुरुष गटातील अंतिम सामन्यात पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनने मुंबईच्या विजय स्पोर्टस् क्लबचा (४०-१७) असा धुव्वा उडवीत एकतर्फी विजय मिळविला. सामन्याच्या मध्यंतराला चांदेरे संघाकडे (३०-८) अशी आघाडी होती.

पुरुष आणि महिला गटात विजयी संघाला १ लाख ५० हजार रुपये आणि करंडक तर उपविजयी संघाला १ लाख रुपये आणि करंडक असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. तसेच यावेळी ‘उत्कृष्ट पकड’ सन्मान निखिल शिंदे (एनटीपीसी नंदूरबार), प्रतिभा निवंगुणे (सुवर्णयुग स्पोर्टस् क्लब), उत्कृष्ट चढाई अजिंक्य कापरे (विजय स्पोर्टस् ), मानशी रोडे (राजा शिवछत्रपती संघ), सर्वोत्कृष्ट खेळाडू अक्षय जाधव (बाबूराव चांदेरे), रेखा सावंत (शिवशक्ती संघ) महापौर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक राहुल भंडारे, किरण दगडे-पाटील, उमेश गायकवाड, सचिन दोडके,  हर्षाली माथवड, सोनाली लांडगे, मंजुश्री खर्डेकर, श्रध्दा प्रभुणे, सविता वाडकर, मोनिका मोहोळ, अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, क्रीडा उपायुक्त संतोष भोर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आयोजक महापौर मोहोळ म्हणाले,’ महापालिकेच्या माध्यमातून सामने होत असले, तरी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन या दोन्ही संस्थांच्या विशेष सहकार्याने ही कबड्डी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेत १००० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले, तर एकूण ११ हजार खेळाडू पुण्यामध्ये खेळण्यात येणार्‍या महापौर चषकात सहभागी झाले, ही आनंदाची बाब आहे. पुण्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा, विद्येचे माहेरघर असलेले शहर क्रीडा क्षेत्रामध्ये पुण्याने देशाला, राज्याला अनेक प्रतिभावान खेळाडू दिले. आपल्या सर्वांच्या सहभागाने चांगल्या प्रकारची स्पर्धा पार पडली’.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ

पुणे - रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे...

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...