पुणे – पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना विविध तांत्रिक विषयांची माहिती मिळावी यासाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन वेळोवेळी करण्यात येते. त्यापार्श्वभूमीवर पोलीस शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त Digital Smart Board, Audio Amplifier System, UPS या State of ART Technology चा वापर असलेल्या सुसज्ज अशा वातानुकूलीत प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये 45 व्यक्तींची बैठक व्यवस्था,चर्चासत्र, प्रशिक्षण सत्र होऊ शकेल असे मोठे सभागृह आहे. या प्रशिक्षण सभागृहाचे उद्घाटन पोलीस महासंचालक यांच्या हस्ते रोजी झाले.पोलीस महासंचालक यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था संजय सक्सेना,पोलीस आयुक्त रितेश कुमार,राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.