प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना डॉ. दीप्ती भल्ला यांचे मार्गदर्शन : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यावतीने आयोजन
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स च्या वतीने मोहिनीअट्टम नृत्यशैली आणि कर्नाटकी संगीत या विषयावर विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता, एरंडवण्यातील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सेमिनार हॉल मध्ये ही कार्यशाळा होणार आहे. अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे संचालक शारंगधर साठे यांनी दिली.
डॉ. दीप्ती भल्ला या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. दीप्ती भल्ला या मोहिनीअट्टमच्या प्रख्यात नर्तक, संशोधक आणि शिक्षिका आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्या प्रख्यात संगीतशास्त्रज्ञ असून पारंपारिक कर्नाटक संगीतावर सखोल संशोधन करत आहेत. त्यांनी संशोधन निष्कर्षांचे नृत्यदिग्दर्शन करून मोहिनीअट्टम नृत्य शैलीचा विस्तार आणि वाढ करण्यात मोठे योगदान दिले आहे.
कार्यशाळेसाठी विनामूल्य प्रवेश असून सहभागी होण्यासाठी ०२०२९९९९६९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

