महाराष्ट्रात 2,96,885 इलेक्ट्रिक वाहनांची नोंद …

Date:

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023-अवजड उद्योग मंत्रालयाने 1 एप्रिल 2019 पासून सुरू होणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 10,000 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीचे पाठबळ असलेली भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब आणि उत्पादनाचा टप्पा II (फेम इंडिया टप्पा II) योजना तयार केली आहे. हा टप्पा प्रामुख्याने सार्वजनिक आणि सामायिक वाहतुकीच्या विद्युतीकरणावर लक्ष केंद्रित करतो आणि 7090 ई-बस, 5 लाख ई-3 चाकी, 55000 ई-4 चाकी प्रवासी गाड्या आणि 10 लाख ई-दुचाकी गाड्यांच्या मागणीला प्रोत्साहन देण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. याशिवाय,या योजनेंतर्गत चार्जिंग पायाभूत सुविधा उभारणीलाही पाठबळ दिले जाते.

फेम इंडिया योजनेच्या टप्पा-II अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांकडून ग्राहकांना 28.07.2023 पर्यंत (http://fame2.heavyindustries.gov.in/dashboard.aspx नुसार) 4157.00 कोटी रुपये (अंदाजे) किमतीची   8,47,578 वाहने विकली गेली आहेत.विक्री झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकारानुसार तपशील खालीलप्रमाणे आहे:

Sl. No.Wheeler TypeTotal No. of Vehicle
1.2 wheeler7,53,140
2.3 wheeler85,168
3.4 wheeler9,270
Total8,47,578

तसेच,अवजड उद्योग मंत्रालयाने 65 शहरे/एसटीयू/राज्य सरकारी आस्थापनांना शहरांतर्गत परिचालनासाठी 6315 इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत.

ई-वाहन पोर्टल (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय) नुसार, राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय कार्यरत इलेक्ट्रिक वाहनांची तपशीलवार यादी परिशिष्टात दिली आहे.

फेम-इंडिया योजना टप्पा -II अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना कोणतेही प्रोत्साहन दिले जात नाही. ग्राहकांना (खरेदीदार/अंतिम वापरकर्ते) प्रोत्साहन/सवलत ही हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी किमतीच्या रूपात प्रदान करण्यात आली आहे, ज्याचा व्यापक अंगिकार करण्यासाठी भारत सरकारकडून मूळ वाहन उत्पादकांना (इव्ही  उत्पादकांना) प्रतिपूर्ती केली जाईल.

परिशिष्ट

वाहन4 नुसार 14.07.2023 पर्यंत कार्यरत इलेक्ट्रिक वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे

Sl. NoState nameTill date State wise – total vehicle registered as Electric
1Andaman & Nicobar Island186
2Andhra Pradesh66,500
3Arunachal Pradesh25
4Assam1,16,605
5Bihar1,55,457
6Chandigarh7,628
7Chhattisgarh52,813
8Delhi2,29,305
9Goa12,139
10Gujarat1,34,273
11Haryana67,812
12Himachal Pradesh2,362
13Jammu and Kashmir10,225
14Jharkhand35,331
15Karnataka2,39,948
16Kerala94,346
17Ladakh65
18Madhya Pradesh92,388
19Maharashtra2,96,885
20Manipur1,198
21Meghalaya129
22Mizoram114
23Nagaland60
24Odisha60,097
25Puducherry4,421
26Punjab34,162
27Rajasthan1,75,595
28Sikkim20
29Tamil Nadu1,67,216
30Tripura14,379
31UT of DNH and DD345
32Uttarakhand48,250
33Uttar Pradesh5,56,629
34West Bengal67,111
Grand Total27,44,019

यानुसार महाराष्ट्रातील 2,96,885 गाड्यांची नोंदणी इलेक्ट्रिक वाहन म्हणून झाली आहे.

1- दिलेला तपशील केंद्रीकृत वाहन 4 नुसार डिजिटलाइज्ड वाहन नोंदीसाठी आहे.

2 – तेलंगणा आणि लक्षद्वीपसाठी डेटा प्रदान केलेला नाही कारण ते केंद्रीकृत वाहन 4 मध्ये समाविष्ट नाहीत.”

अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...