पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मंगळवारी (दि. १ ऑगस्ट) शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या व आंबेडकर चळवळीतील विविध पक्षसंघटना आंदाेलन करणार आहेत. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे मंडईतील टिळक पुतळ्याजवळ सकाळी ८.३० वाजता आंदोलन करून निषेध करण्यात येणार आहे.
एकीकडे लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंचावर उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, त्यांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंगळवारी पुण्यात येत आहेत. या पुरस्कार सोहळ्याला उद्या १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल होणार आहे
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने दिल्लीतील सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेत एनडीएचे 332 खासदार म्हणजेच पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे हे विधेयक पहिल्यांदा लोकसभेत मांडून नंतर ते राज्यसभेत मांडले जाईल. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोरील पेच सुटला असून ते पुणे येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदाण करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पवारांनी दिल्लीतील सेवा विधेयक मांडले जात असताना संसदेत उपस्थित राहावे अशी विनंती केली होती. त्यामुळे पवार कोणाल महत्त्व देतील? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आता पवार यांच्यासमोरील पेच सुटला आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेत मंजूरीसाठी येईल. त्यानंतर यावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी शरद पवारांनी राज्यसभेत उपस्थित राहावे अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली हेाती.
मणिपूर जळत असताना पंतप्रधान पुण्यात पुरस्कार घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ भजन करून त्यांना सद्बुद्धी देण्याची मागणी करणार आहोत. निषेध म्हणून काळे कपडे परिधान करणार आहाेत, असे आंदाेलनाच्या तयारीतील कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर आता दुसरीकडे पोलिसांनी महाविकास आघाडीसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना नोटीस धाडल्या आहे.

