उधमपूर मतदारसंघात असलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आणि आशियातील सर्वात लांब अत्याधुनिक बोगदा हे राष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहेत, जे नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर गेल्या 9 वर्षांत या मतदारसंघात आले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी केले. डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या मतदारसंघातील पंचायत राज संस्थांचे प्रतिनिधी, पंच, सरपंच, भाजप पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांसाठी दोन तासांची स्नेहभोजन बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ जितेंद्र सिंह हे त्यांच्या मतदारसंघातील विविध भागांतील प्रतिनिधींसोबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नियमितपणे अशा बैठकीचे आयोजन करतात. आजची बैठक अशाच सत्राचा भाग होती. आजच्या बैठकीत डोडा, बाशोली, बिल्लावर, कठुआ आणि रामबन येथील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
उधमपूर-दोडा-कठुआ लोकसभा मतदारसंघात गेल्या 9 वर्षांत अभूतपूर्व विकास कामे झाली आहेत, मात्र मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले यावेळी म्हणाले.
उधमपूर-दोडा-कथुआ लोकसभा मतदार संघ हा भारतातल्या सर्वात विकसित मतदार संघांपैकी एक असावा अशी प्रतिक्रिया देणारा जन सर्वेक्षणाचा अहवाल या प्रतिनिधी मंडळाने जितेंद्र सिंह यांना सादर केला.
या विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. पंतप्रधानांनी मे 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्य क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षांत तीन केंद्रीय अर्थसहाय्यित वैद्यकीय महाविद्यालये मिळवणारा उधमपूर-दोडा-कठुआ हा भारतातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

