Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

काँग्रेसचे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन-

Date:

पुणे- भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास तीव्र अभिनव असे भाजपा वॉशिंग मशीन, मोदी वॉशिंग पावडरच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करण्यात आला.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, गोपाळ तिवारी, पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष वॉशिंग मशीन ठेवून त्यावर भाजपा वॉशिंग मशीन असे लिहिले होते. तसेच सोबत मोदी वॉशिंग पावडरही ठेवण्यात आली होती.
याप्रसंगी विविध घोषणांचे फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते – ‘इडी, सीबीआय, इनकम टॅसचे डाग धुवून मिळतील भाजपा वॉशिंग मशीन‘ ‘भारत मे पाप धोने के दो तरीके हैं… १) गंगा में स्नान २) BJP में छलांग…‘ ‘ मोदी वॉशिंग पावडर‘ अशा अनेक अभिनव घोषणांचे फलक हाती घेऊन कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, देशातील महागाई, बेकारी आणि भ्रष्टाचार यामुळे पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही व मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही. हे लक्षात आल्यामुळेच इडी, सीबीआय आदिंचा वापर करुन भाजप छोटे पक्ष फोडत आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍यांना भाजपमध्ये घेत आहे. ही जनतेची आणि लोकशाहीची क्रुर थट्टा आहे. महाराष्ट्रात भाजपने केलेला फोडाफोडीचा तमाशा जनता बघत असून येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करेल असे ते म्हणाले.या आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. त्यामध्ये अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, रफिक शेख, रमेश अय्यर, शाणी नौशाद, रजनी ताई त्रिभुवन, राजेंद्र शिरसाठ, सुनील मलके, अनिल सोंडकर, नुरुद्दीन सोमजी, मंजूर शेख, प्रशांत सुरसे, भूषण रानबरे, अजय पाटील, चैतन्य पुरंदरे, भरत सुराणा, मारुती माने, प्रवीण करपे, रमेश सकट, शोएब इनामदार, सुनील घाडगे, प्रदीप परदेशी, अजित जाधव, चेतन अग्रवाल, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, ओंकार मोरे, विशाल मलके, आशिष व्यवहारे, सुरेश कांबळे, गौरव बोराडे, नीलेश बोराटे, शाबीरखान आयुब पठाण, किशोर मारणे, संकेत गलांडे, साजिद शेख, प्रा. वाल्मिकी जगताप, सोमेश्वर बालगुडे, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, अंजली सोलापुरे, सुविधा त्रिभुवन, डॉ. गिरीजा शिंदे, सोनिया ओव्हाळ, आस्मा शेख, संगीता थोरात, ज्योती परदेशी, रेश्मा शिलेगावकर, कांता डोने, कविता गायकवाड, पपीता सोनवणे, मंदाकिनी नलावडे, शिवाजी सोनार, शिवाजी भोईटे, जीवन चाकणकर, विनोद रणपिसे, अनिल पवार, राजू शेख, विजय वारभुवन, ऋषिकेश बालगुडे, राजू नाणेकर, परवेज तांबोळी, गणेश भंडारी, जयकुमार ठोंबरे, निलेश मोटा, दीपक ओव्हळ, अॅनड. राजेंद्र काळबेर, फैय्याज शेख, असलम बागवान, नूर शेख, गणेश काकडे, रमेश राऊत, राजेश जाधव, डॉ. साठे, प्रसन्न मोरे, अनुप बेगी, अक्षय सोनवणे, गणेश साळुंखे, राजू देवकर, मंगेश थोरवे, गोरख पळसकर, साहिल राऊत, बंडू शेंडगे, विनायक तामकर, नरेश नलावडे, धनंजय भिलारे, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबासाहेब गुंजाळ, निलेश धुमाळ, उमेश काची, सागर कांबळे, नितीन जैन, रफिक आलमेल, रनजीत गायकवाड, सुरेश नांगरे, सादिक लुकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...